अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:21 IST2025-10-03T16:20:13+5:302025-10-03T16:21:10+5:30
एका कुटुंबाने आपल्या जावयाला हायवेवर दिवसाढवळ्या बेदम मारहाण केली.

अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील हाफिजपूर पोलीस स्टेशन परिसरातील ईमटोरी गावातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबाने आपल्या जावयाला हायवेवर दिवसाढवळ्या बेदम मारहाण केली. पळवून पळवून त्याला मारलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला.
ईमटोरी गावातील रहिवासी सोनूच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, सोनूचा त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबाशी भांडण झालं होतं. त्यानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबातील चार-पाच जण त्याच्या घरी आले, त्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि विष पाजलं. सोनू जीव वाचवण्यासाठी पळत असताना या लोकांनी त्याचा पाठलाग केला आणि हायवेवर त्याला मारहाण केली. हा हल्ला हायवेवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
सोनूच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. मृत्यूबाबत समजताच, हाफिजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक मनीष चौहान पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली. पुरावेही गोळा करण्यात आले. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
या संदर्भात, हाफिजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक मनीष चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू मागचं खरं कारण स्पष्ट होईल. सध्या विविध पैलू लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.