शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Encounter ... म्हणून २८ वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी केले असेच एन्काउंटर

By पूनम अपराज | Updated: December 6, 2019 18:50 IST

पोलिसांनी एन्काउंटर करून सराईत दोन गुंडांना यमसदनी पाठविले होते.

ठळक मुद्दे९ एप्रिल १९९१ साली मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्वेकडे घडलेली ही घटनासापळा रचून त्यांना पकडायला गेले असता आरोपी बळी आणि बाबा यांनी चॉपरने पोलिसांवर हल्ला केला.

- पूनम अपराज

मुंबई - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींचा आज पहाटे ५.३० वाजता  एन्काऊंटर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामूहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते असल्याची माहिती सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली. मात्र, पोलिसांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर करून खात्मा केला. या घटनेसारखे सामूहिक बलात्कारात दोन आरोपींनी मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी एन्काउंटर करून सराईत दोन गुंडांना यमसदनी पाठविले होते.९ एप्रिल १९९१ साली मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्वेकडे घडलेली ही घटना आज हैदराबाद प्रकारणानंतर निवृत्त पोलीस अधिकारी अंबादास पोटे आणि मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निगुडकर यांना आठवली आहे. वाकोला पोलीस ठाण्यात मी गुन्हे विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होतो. ९ एप्रिल १९९१ साली रात्री वाकोला पोलीस ठाण्यात ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार देण्यास पीडित मुलीचे आई - वडील आले होते. त्यानंतर आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली. ७ दिवसांनी आरोपी बळी नांदिवडेकर आणि बाबा परमेश्वर हे सांताक्रूझ येथील धोबीघाट परिसरातील आग्रीपाडा झोपडपट्टी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा आम्ही तेथे गेलो असता आरोपींनी पोलीस शिपाई आणि अंमलदारावर चॉपरने छातीवर वार केले. पोलिसांच्या झटापटीत आम्ही आरोपींवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा खात्मा केला अशी माहिती निवृत्त पोलीस अधिकारी अंबादास पोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

त्यावेळी पोलीस उपायुक्त अरुप पटनाईक यांनी १९९१ च्या सामूहिक बलात्कारात आरोपी ७ दिवस झाले तरी मोकाट असल्याने पोलिसांना फैलावर घेतले होते. पोलीस अधिकारी असलेल्या अंबादास पोटे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तपास पथकात एन्काउंटर करताना पोलीस उपनिरीक्षक सुधीर निगुडकर हे देखील सामील होते. निगुडकर आता मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देखील १९९१ च्या एन्काउंटरबाबत जाणून घेतले.

निगुडकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, १९९१ साली ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. त्यावेळी मी वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी वडिलांना चॉपरचा धाक दाखवून त्यांच्यासमोर त्यांच्या पोटच्या मुलीवर १० बाय १० च्या चाळीतील खोलीत सराईत गुंडांनी सामूहिक बलात्कार केला होता. ७ दिवसांनी आरोपी आग्रीपाडा झोपडपट्टी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांना पकडायला गेले असता आरोपी बळी आणि बाबा यांनी चॉपरने पोलिसांवर हल्ला केला. आमच्या एका पोलिसाला छातीवर १७ ते १८ टाके पडले होते. बळी आणि बाबा त्याकाळात सराईत गुंड होते आणि त्यांची दहशत देखील खूप होती. त्यांचा एन्काउंटर केल्यानंतर परिसरात दिवाळीप्रमाणे फटाके लावून सेलिब्रेशन करण्यात आलं. तो क्षण आज हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमुळे आठवला. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईhyderabad caseहैदराबाद प्रकरणGang Rapeसामूहिक बलात्कार