रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 19:01 IST2021-10-07T17:49:49+5:302021-10-07T19:01:15+5:30

Death Case : उल्हासनगरातील सेंट्रल हॉटेलसमोर सापडला मृतदेह

A single sensation as the body was found in a pool of blood | रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ

ठळक मुद्देदारूच्या नशेत पडून तरुणाचा मृतदेह झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी दिली.उल्हासनगरात गेल्या महिन्यात बलात्कार, खून, चोरी आदी गुन्ह्यांने शहर हादरून गेले होते.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प रोड वरील सेंट्रल पार्क हॉटेल समोर गुरवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तपास करीत असून दारूच्या नशेत पडून तरुणाचा मृतदेह झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी दिली.

उल्हासनगरात गेल्या महिन्यात बलात्कार, खून, चोरी आदी गुन्ह्यांने शहर हादरून गेले होते. गुरवारी सकाळी कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प रोड वरील सेंट्रल हॉटेल समोर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याचे नाव गोपाळ असून तो राजस्थान येथे राहणारा आहे. कॅम्प नं-३ परिसरात एका इमारती मध्ये काम करीत असून त्याला दारूचे वेशन होते.

दारूच्या नशेत पडून डोक्याला मार लागून तरुणाचा मृत्यू झाला असावा. असा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी व्यक्त केला. मृत तरुणांच्या नातेवाईकां सोबत संपर्क साधण्याची पर्यंत पोलीस करीत असून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहे.

Web Title: A single sensation as the body was found in a pool of blood