पतीवर गोळीबार, मृत्यूनंतर दोन दिरांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप अन् सासूचाही काढला काटा; पूजाच्या कारनाम्यांचं फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:36 IST2025-07-02T13:33:38+5:302025-07-02T13:36:38+5:30
पूजाचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. पूजाने आपल्याच पतीवर गोळ्या झाडायला लावल्या होत्या. त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पूजा तिचा दीर कल्याण सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली होती.

पतीवर गोळीबार, मृत्यूनंतर दोन दिरांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप अन् सासूचाही काढला काटा; पूजाच्या कारनाम्यांचं फुटलं बिंग
Live-in Relationship Crime: एका वयस्कर महिलेची २४ जून रोजी हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात मयत महिलेची लहान सून आणि तिच्या बहिणीचं नाव समोर आलं. पोलिसांनी दोघींना अटक केली. त्यानंतर केलेल्या चौकशीत जे उघड झालं, ते ऐकून पोलिसही चक्रावले. सासूची हत्या केल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या पूजाने पतीची हत्या केली. त्यानंतर विवाहित असलेल्या दोन दिरांसोबतच ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती, हेही समोर आले. तिला मूलही झाले आणि त्यानंतर सुरू झाले वाद.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील. कुम्हारिया गावात हे सगळं घडलं. ५४ वर्षीय सुशीला देवी यांची २४ जून रोजी पहाटे हत्या करण्यात आली. पोलिसांनी तपास केला. त्यात सुशीला देवीची लहान सून पूजा आणि तिची बहीण कमला ऊर्फ कॉमनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांची नावे समोर आली.
अनिल वर्मा चकमकीत जखमी
पोलिसांनी दोघींना अटक केली. पण, अनिल फरार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. मंगळवारी (१ जुलै) रात्री चोरी केलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी तो एका नातेवाईकाकडे जात होता. त्यावेळी पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. पण, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, त्यात अनिल वर्मा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्याजवळ मयत सुशीला देवीच्या घरातून चोरीला गेलेले ८ लाख रुपयाचे दागिने, मोटारसायकल आणि देशी कट्टा मिळाला.
पतीवरील झाडल्या गोळ्या, दिरांसोबतच लिव्ह इन रिलेशन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे तिच्याच दिरासोबत प्रेमसंबंध होते. पूजाने आपल्याच पतीवर गोळ्या झाडायला लावल्या होत्या. त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पूजा तिचा दीर कल्याण सिंह याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागली. ६ वर्षांपूर्वी कल्याण सिंहचे निधन झाले.
त्यानंतर मोठा दीर आणि सासरा पूजाला गावी म्हणजे कम्हारिया येथे घेऊन आले. तिथे राहत असतानाच तिचे मोठा विवाहित दीर संतोष सिंहसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांना एक मुलगीही झाली. त्यानंतर घरात वाद सुरु झाले. संतोषच्या पत्नीचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे ९ महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली.
पूजाने पोलिसांना सांगितले की, दीर आणि सासऱ्याकडे १६ एकर जमीन आहे. तिला तिच्या वाट्याची जमीन विकायची होती आणि ग्वालियरमध्ये राहायचं होतं. दीर आणि सासरा तयार होते, पण सासू सुशीला देवी विरोध करत होती. त्यामुळेच तिने बहीण आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून हत्या केली.