शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'पत्नीला गोळी मार, ५० हजार देतो'; पतीनेच दिली सुपारी अन् प्रियकरावर घेतला आळ! कसा पकडला गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:54 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची सुपारी दिली. इतकंच नाही तर..

पती-पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यावर टिकलेलं असतं, असं म्हटलं जातं. पण याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने तिची हत्या करण्यासाठी चक्क ५० हजार रुपयांची सुपारी दिली. इतकंच नाही, तर पत्नीवर गोळीबार झाल्यानंतर त्याने स्वतः पोलीस ठाणे गाठून ज्याच्यावर संशय होता, त्याच तरुणाविरुद्ध तक्रारही दाखल केली. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे या कपट पतीचा खरा चेहरा समोर आला आहे.

काय आहे नेमकी घटना? 

गाझियाबादच्या कमिशनर कॉलनी परिसरात राहणाऱ्या अंकितला आपल्या पत्नीचे कुटुंबातीलच एका तरुणाशी अवैध संबंध असल्याचा संशय होता. हा संशय त्याच्या डोक्यात इतका भिनला की त्याने पत्नीलाच संपवण्याचा आणि त्या तरुणाला जेलमध्ये पाठवण्याचा फुलप्रूफ प्लॅन तयार केला. अंकितने तीन भाडोत्री मारेकऱ्यांशी संपर्क साधला आणि ५० हजार रुपयांत पत्नीच्या हत्येचा सौदा केला.

दोन वेळा हुकला निशाणा, तिसऱ्यांदा झाडली गोळी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी गेल्या एका आठवड्यात दोन वेळा अंकितच्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण दोन्ही वेळा तो अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात मात्र शूटर्सनी महिलेवर गोळी झाडली आणि ते तिथून पसार झाले. सुदैवाने, या हल्ल्यातून महिला बचावली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि ती धोक्याबाहेर आहे.

असा उघड झाला पतीचा बनाव 

पत्नीला गोळी लागल्यानंतर अंकितने तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि ज्या तरुणावर त्याचा संशय होता, त्याच्याच विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना तीन संशयित व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सर्व सत्य सांगेन टाकले. त्याने सांगितले की, "दुसऱ्या कोणी नाही, तर स्वतः पती अंकितनेच आम्हाला ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती."

पोलिसांनी आता आरोपी पती अंकित आणि सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband pays hitmen to kill wife, blames lover; truth revealed.

Web Summary : In Ghaziabad, a husband, suspecting infidelity, hired hitmen for ₹50,000 to kill his wife and framed her alleged lover. Police investigation exposed his deceit after a failed murder attempt. All are arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार