धक्कादायक! पत्नीचा गळा आवळून खून, नंतर पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:35 IST2020-09-08T14:34:54+5:302020-09-08T14:35:19+5:30

वर्षभरानंतर मृत पतीविरोधात गुन्हा : पथ्रोट येथील घटना

Shocking! Wife strangled to death, then husband commits suicide | धक्कादायक! पत्नीचा गळा आवळून खून, नंतर पतीने केली आत्महत्या

धक्कादायक! पत्नीचा गळा आवळून खून, नंतर पतीने केली आत्महत्या

ठळक मुद्दे दरम्यान १३ महिन्यांनी, ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.            

पथ्रोट (अमरावती) : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ४.३० वाजता पथ्रोट येथे घडली होती. दरम्यान १३ महिन्यांनी, ७ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
           
गजानन धर्मुजी कैकाडे (३५) व ज्योत्स्रा गजानन कैकाडे (३०, दोन्ही रा. पथ्रोट) अशी मृतांची नावे आहेत. मृत पतीपत्नीचे नातलग व साक्षीदारांचे जबाब, सोबतच अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावरून पथ्रोट पोलीस खूनआत्महत्या या निष्कर्षाप्रत पोहोचले. ज्योत्स्रा कैकाडे हिचा गळा आवळला गेल्याने त्यांचा श्वासोच्छवास थांबला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. आरोपी पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या निष्कर्षावरून ठाणेदार मनोज चौधरी यांनी सरकारीपक्षातर्फे तक्रार नोंदवून मृत पती गजानन कैकाडे याचेविरूद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
           
पोलीस सुत्रानुसार, घरगुती वादातून कैकाडे दाम्पत्यात कडाक्याची भांडणे होत होती. दरम्यान, १३ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ते दाम्पत्य मृतावस्थेत शेजाऱ्यांना दिसले होते. त्यावेळी पथ्रोट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. चौकशीदरम्यान मृत दाम्पत्याच्या नातेवाईक व शेजाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

 

Web Title: Shocking! Wife strangled to death, then husband commits suicide