Video : धक्कादायक! स्वच्छतागृहात लपून शिक्षिकेचा व्हिडीओ करणाऱ्यास विद्यार्थ्यांचा बेदम चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:12 IST2019-08-30T16:10:01+5:302019-08-30T16:12:16+5:30
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : धक्कादायक! स्वच्छतागृहात लपून शिक्षिकेचा व्हिडीओ करणाऱ्यास विद्यार्थ्यांचा बेदम चोप
नाशिक - येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही.एन. नाईक महाविद्यालयात शिक्षिकेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महाविद्यालयातील कंत्राटी सुरक्षा रक्षक आहे. तो पुरुष स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाईलच्या सहाय्याने कपडे बदलतानाचे चित्रिकरण करीत होता. यावेळी त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाल्याने महिलेला संशय आला.तिने वर पाहिले असता संशयिताचा हात आणि मोबाईल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे घाबरलेल्या सुरक्षा रक्षकानेही पळ काढला असता महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदन चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.