शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 22:00 IST

Crime News : आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला.

- किशोर वंजारी

 यवतमाळ - आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला. पेय सेवनासाठी शपथही घालण्यात आली, अशी कबुली दिल्याने पोलिसांनी तिला अटक केली. नेर येथे घडलेल्या विषप्रयोगाचे रहस्य अखेर उलगडले.

जांभुळणी (ता.बाभूळगाव) येथील किशोर परसराम राठोड या युवकाचा विवाह कोव्हळा (ता.नेर) येथील युवतीशी जुळला. १९ एप्रिल रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार होते. त्यापूर्वीच तिच्या मनात होणाऱ्या पतीविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली. त्याला कारण तिचे एका युवकाशी असलेले प्रेमसंबंध हाेते. आठ वर्षांपासून त्यांचा हा सिलसिला सुरू होता.

किशोरचे तिच्याशी लग्न होऊ नये, यासाठी या प्रेमवीरांनी प्लान आखला. १५ एप्रिल रोजी तिने किशोरला नेर येथे एका कोल्ड्रिंक हाउसमध्ये बोलाविले. यावेळी तिची लहान बहीण आणि दोन भाऊ सोबत होते. बोलता-बोलता तिने नियोजित वर किशोरकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. किशोरने ही रक्कम दिलीही. त्याच वेळी तिने किशोरला थंडपेय पिण्याची गळ घातली. दोघांसाठीही पेय बोलाविण्यात आले. तिने मात्र पेय पिण्यास नकार दिला. तरीही काही घोट तिने घेतले. तिने घेतलेल्या थंड पेयामध्ये विषारी द्रव टाकले. प्रेमाची शपथ घालत तिने किशोरला द्रव टाकलेले पेय घेण्यास सांगितले. याच ठिकाणी किशोरचा घात झाला.

थंड पेय पिताच किशोरला मळमळ सुरू झाली. त्याच वेळी किशोरची होणारी पत्नी व तिचे भाऊ दुचाकीने निघून गेले. किशोर आपल्या मित्रासोबत कोव्हळा येथे जात असताना चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला तातडीने नेर व नंतर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्याला विषबाधा झाल्याचे पुढे आले. १३ दिवसांनी प्रकृती ठीक झाल्यानंतर किशोरने पोलिसात तक्रार दिली.पळून जाण्याची होती योजनायुवतीला अटक केल्यावर या प्रकाराचे रहस्य बाहेर आले. तिने सारी कथाच सांगितली. लग्न तुटावे, म्हणून प्रियकराच्या मदतीने विषप्रयोगाचा प्रयत्न केला असल्याचे तिने जबाबात कबूल केले. लग्नाची तारीख पुढे जावी, पळून जाण्याची संधी मिळावी, म्हणून हा सर्व प्रकार घडवून आणल्याची ती म्हणाली. या कटामध्ये प्रियकरही सहभागी आहे. त्याच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याचा पोलीस विभागातील एक नातेवाईक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.प्रियकराच्या मदतीने विषप्रयोगाचा प्रयत्न केला असल्याचे तिने जबाबात कबूल केले. लग्नाची तारीख पुढे जावी, पळून जाण्याची संधी मिळावी, म्हणून हा सर्व प्रकार घडवून आणल्याची ती म्हणाली. या कटामध्ये प्रियकरही सहभागी आहे. त्याच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याचा पोलीस विभागातील एक नातेवाईक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र