Shocking! Nude photo shows the young girl; duo arrested | धक्कादायक! तरुणीला न्यूड फोटो दाखविल्याप्रकरणी दोघांना बेड्या
धक्कादायक! तरुणीला न्यूड फोटो दाखविल्याप्रकरणी दोघांना बेड्या

ठळक मुद्देसंजय गुप्ताने तरुणीला शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले.गुप्ता आणि कदमने तक्रारदार तरुणीला न्यूड फोटो दाखवले.गुप्ता आणि कदम यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ५०९ आणि ३५४ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला

मुंबई - तरुणीला न्यूड फोटो दाखवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक केली. संजय कुमार गुप्ता (४२) आणि सचिन कदम (३५) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपी संजय कल्याण आणि सचिन अंधेरी येथे राहतो. नेहरु नगर पोलिसांनी ही माहिती दिली.

तक्रारदार तरुणी नवी मुंबईत राहयला असून ती सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करत आहे. कामानिमित्त तिच्या मैत्रिणीने तिला संजय गुप्ताची भेट घ्यायला सांगितली होती. संजय गुप्ताने तरुणीला शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांना सचिन कदम भेटला.

गुप्ता आणि कदमने तक्रारदार तरुणीला न्यूड फोटो दाखवले. तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिला एका न्यूडिटी संदर्भातील कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले. तरुणीने तिच्या पालकांना कुर्ला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले. त्यांनी दोन्ही आरोपींना मारहाण केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गुप्ता आणि कदम यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ५०९ आणि ३५४ अ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेहरु नगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.  
 

Web Title: Shocking! Nude photo shows the young girl; duo arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.