नागपुरात मजुराजवळ आढळली धारदार शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:20 IST2020-01-23T01:19:36+5:302020-01-23T01:20:58+5:30

पाचपावली पोलिसांनी एका मजूर युवकाला अटक केली.त्याच्या जवळ तलवार, चाकूसह आठ धारदार शस्त्रे आढळली.

Sharp weapons found near laborers in Nagpur | नागपुरात मजुराजवळ आढळली धारदार शस्त्रे

नागपुरात मजुराजवळ आढळली धारदार शस्त्रे

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या इशाऱ्यावर काम : पाचपावली पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांनी एक मजूर युवकाला धारदार शस्त्रासह अटक केली आहे. जीशान अली ऊर्फ डिडा शब्बीर अली (२०) रा. टेका मोठी मस्जिदजवळ असे आरोपीचे नाव आहे. जीशान डेकोरेशनचे काम करतो. पाचपावली पोलिसांच्या त्याच्याजवळ शस्त्र असल्याची माहिती मिळाली. जीशान मंगळवारी सायंकाळी पोत्यात शस्त्र ठेऊन घरून जात होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला पकडण्यात आले. त्याच्या जवळ तलवार, चाकूसह आठ धारदार शस्त्र आढळले. चौकशीत त्याने कुख्यात गुन्हेगार फिरोज ऊर्फ टेन याने १५ दिवसापूर्वी शस्त्र दिल्याचे सांगितले. जीशानने दिलेल्या माहितीनुसार फिरोजशी त्याची मैत्री आहे. फिरोजने त्याला हे शस्त्र काही दिवसापूर्वी घरात ठेवण्यासाठी दिले होते. फिरोजच्या सांगण्यानुसार हे शस्त्र देण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले. जीशानच्या सूचनेवरुन पोलिसांनी त्वरित फिरोजच्या घरी धाड टाकली. परंतु तो आधीच फरार झाला. फिरोज कुख्यात आरोपी आहे. त्याने मोठी योजना घडवून आणण्यासाठी शस्त्र जीशानला सोपविल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आपल्या घरी कधीही धाड टाकू शकतात हे फिरोजला माहीत होते. जीशान फिरोजसाठी काम करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. फिरोज हाती लागल्यानंतर खरी स्थिती स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी जीशानविरुद्ध शस्त्र विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई निरीक्षक किशोर नगराळे, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरोशे, हवालदार विजय यादव, राजेश देशमुख, रविशंकर मिश्रा, विनोद गायकवाड, विजय जाने, सुनील वानखेडे, निलीमा सिंगाडे यांनी केली.

Web Title: Sharp weapons found near laborers in Nagpur