एकाच कंपनीत असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:34 PM2020-07-06T14:34:47+5:302020-07-06T14:35:37+5:30

पीडित महिला आणि आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

Sexual harassment by befriending with women in the same company | एकाच कंपनीत असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार

एकाच कंपनीत असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांनी तरुणाला केली अटक

पिंपरी : एकाच कंपनीत नोकरीस असलेल्या महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तसेच तिच्या मुलाला सांभाळतो असे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. बावधन व सूसगाव, बाणेर येथे २८ फेब्रुवारी २०१९ ते २ जुलै २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.
याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि. ५) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर किवित अशोक पाटील (वय ३०, रा. सूसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे दोघे एकाच कंपनीत कामाला असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी याने महिलेशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दिले. महिलेच्या मुलाला सांभाळतो, असे सांगून आरोपी याने स्वत:च्या घरी व महिलेच्या घरी महिलेवर लैंगिक अत्याचार केले. यात महिला गरोदर राहिली. त्यांनी एका खासगी रुग्णालयात गर्भपात केला. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी याला अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment by befriending with women in the same company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.