Sensational! The girl attempted suicide by jumping into the lake pda | खळबळजनक! तलावात उडी मारून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न 

खळबळजनक! तलावात उडी मारून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न 

ठळक मुद्देपरिसरातील व्यक्तींनी तरुणीला तलावातून बाहेर काढले.याबाबत पोलीस तपास करत असून पोलिसांना सुसाइट नोट सापडलेली नाही. 

पनवेल - शहरात कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरु असताना दुसरीकडे पनवेल शहरात वडाळे तलावात तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. नंतर घटनास्थळी काही लोकं जमले आणि त्या परिसरातील व्यक्तींनी तरुणीला तलावातून बाहेर काढले. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस तपास करत असून पोलिसांना सुसाइट नोट सापडलेली नाही. 

Web Title: Sensational! The girl attempted suicide by jumping into the lake pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.