शाळेने बळजबरीने नेले सहलीला; सुरज वॉटरपार्कमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 08:34 PM2019-01-14T20:34:20+5:302019-01-14T20:38:34+5:30

त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर अखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला.

School took forcefully; The death of the student in Suraj Waterpark | शाळेने बळजबरीने नेले सहलीला; सुरज वॉटरपार्कमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेने बळजबरीने नेले सहलीला; सुरज वॉटरपार्कमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देअखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला.कित्येक विद्यार्थी या सहलीला जाण्यासाठी तयार नव्हते.

वसई - शैक्षणिक सहलीत दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी उद्रेक केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर अखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला.

नालासोपारा पूर्व ओसवालनगरीतील नवजीवन शाळेची शनिवारी ठाण्याच्या सुरज वॉटर पार्कमध्ये सहल गेली होती. या सहलीत दहावीतील विद्यार्थी दिपक रामचंद्र गुप्ता या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी पसरल्यावर पालकांनी शाळेकडे धाव घेतली. त्यानंतर दिपकचा मृतदेह नालासोपारात आणून शवविच्छेदन केल्यावर तो पालकांच्या ताब्यात देण्यात आला. कित्येक विद्यार्थी या सहलीला जाण्यासाठी तयार नव्हते. त्यांना शाळेने बळजबरीने सहलीला नेले. त्यामुळे दिपकला आपला जीव गमवावा लागला. या भावनेतून हजारो नागरिक शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उद्रेक केला.

विद्यार्थ्यांना धाक दाखवून शाळेच्या व्यवस्थापनाने सहलीला नेले. त्यानंतर पाण्यात उतरताना शाळेने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे शाळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दिपकच्या कुंटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत नागरिकांनी शाळेच्या आवारात उद्रेक केला. त्यांना आवरण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठामारही करावी लागला. पोलीस उपाधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी बळजबरीने विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात आले आणि त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. दिपकचा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले

Web Title: School took forcefully; The death of the student in Suraj Waterpark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.