शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

गरोदर राहिल्याने शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार आला उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:40 IST

अज्ञात व्यक्तीकडून सहा महिन्यांपूर्वी कुकर्म 

ठळक मुद्देयाप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला वाटले आई आली. तीने दरवाजा उघडला असता त्या व्यक्तीने मुलीला खाली पाडून तोंड दाबून पुन्हा अतिप्रसंग केला.

नाशिकरोड : देवळालीगावातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना अज्ञात इसमाने सायकलला धडक देऊन तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी(दि.18) उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळालीगाव परिसरात राहणा-या अल्पवयीन विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेतून सायकलावर घरी येत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या सायकलला धक्का दिल्याने ती खाली पडले. यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याचा गैरफायदा त्या तोंडावर रुमाल बांधलेल्या नराधमाने घेतला. शाळकरी मुलीला बाजूला एका पडीक जागेत नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, ती बेशुध्द पडली असता नराधम त्याच अवस्थेत तिला सोडून फरार झाला. काही वेळेनंतर ती शुध्दीवर आली आणि कसेबसे घर गाठले. घरी आई वडिलांना सांगितले तर ते शिक्षण बंद करतील या भितीमुळे विद्यार्थिनीने कोणालाही काही सांगितले नाही. दोन आठवड्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास ती पीडित शाळकरी मुलगी घरी एकटी होती. आई वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. 

 

मुलीला वाटले आई आली. तीने दरवाजा उघडला असता त्या व्यक्तीने मुलीला खाली पाडून तोंड दाबून पुन्हा अतिप्रसंग केला. वडिल खूप रागट स्वभावाचे असल्याने घाबरून पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही. दहा दिवसांपूर्वी या पीडित मुलगी आई वडिलांसह कन्नड विठ्ठलपूर येथे मामाच्या घरी गेली. मुलीचे पाय व पोट खूप दुखत असल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा ती गरोदर असल्याचे उघड झाले. मुलीने सर्व घटना पालकांना सांगितली. औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तिविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला सून पोलीस त्या नराधमाचा शोध घेत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

 

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

 

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

 

19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणNashikनाशिकSchoolशाळाPoliceपोलिसRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदा