19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:57 PM2020-08-18T17:57:59+5:302020-08-18T17:58:40+5:30

घोडबंदर रोडवरील हिल गार्डन बंगलोज या सोसायटीत 22 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत परिसरातील तब्बल 18 मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाला.

Suspicious death of 19 cats, possibility of poisoning | 19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू, विष देऊन मारल्याची शक्यता

Next
ठळक मुद्देया मांजरीस 14 ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक रहिवाशी पूजा जोशी यांनी खायला अन्न दिले होते.

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिल गार्डन बंगलोज या सोसायटीत तब्बल 19 मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घोडबंदर रोडवरील हिल गार्डन बंगलोज या सोसायटीत 22 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत परिसरातील तब्बल 18 मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाला. तर 15 ऑगस्ट रोजी देखील एका काळ्या मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाला. 

 

या मांजरीस 14 ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक रहिवाशी पूजा जोशी यांनी खायला अन्न दिले होते. त्यावेळी ही मांजर अत्यंत निरोगी होती व खेळत होती. परंतु अचानक या मांजरींचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने पूजा जोशी यांना संशय आला. त्यांनी या मृत्यू पावलेल्या मांजरीचे निरीक्षण केले असता तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. तसेच तिच्या शरीराचा रंग देखील बदलला होता. यावरून या मांजरीस कुणीतरी विष देऊन मारल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला. त्यानंतर पूजा जोशी यांनी या घटनेची तक्रार चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी रोडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मयत मांजरीचे शव विच्छेदनासाठी परेल येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल तीन-चार दिवसात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटने प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर

 

बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी

 

पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी

 

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

 

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न

Web Title: Suspicious death of 19 cats, possibility of poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.