पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:52 PM2020-08-17T22:52:25+5:302020-08-17T22:53:11+5:30

आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला.

The husband was preparing to flee to Nepal by cutting his wife into six pieces but ... | पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

पत्नीचे सहा तुकडे करून नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता पती पण...

Next
ठळक मुद्देमुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला.

बाराबंकी - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका महिलेचा मृतदेह ट्रॉलीच्या पिशवीत आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तपासादरम्यान धागेदोरे जोडून पोलीस आरोपी पतीपर्यंत पोचले. आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून सुटण्यासाठी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या सातर्कतेने त्याचा हेतू अयशस्वी केला. त्यामुळे या पोलिसांच्या पथकाला एसपीने 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले.


महामार्गावरील एका ब्रीफकेसमध्ये मृतदेह अनेक तुकड्यात सापडला

लखनौ-अयोध्या महामार्गावरील कोतवाली नगर परिसरातील सफेदाबाद येथील केवाडी मोरजवळ एका ब्रीफकेस आणि बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला. मुंबईतील  आंबेडकर-टाटा-वाशाट रोड येथील भरतनगर येथील सम्राट शेखची मुलगी मालन बादशाह शेख उर्फ आयशा असे मृृृत महिलेचे नाव आहेत. लखनौच्या इंदिरानगरमध्ये आयशाची तिच्या पतीने हत्या केली आणि मृतदेहाचे सहा तुकडे केले. पोलिसांनी पोलिसांना आरोपीस इंदिरानगर पोलिस स्टेशन परिसरातील पाळत ठेवून अटक केली.


5 जुलै रोजी हत्या केली होती
मिळालेल्या माहितीनुसार, आपापसात झालेल्या वादानंतर लखनौच्या इंदिरा नगरातील सेक्टर -14 येथे राहणारा पती समीर खानने 5 जुलै रोजी आयशाची हत्या लोखंडी रॉडने केली होती. समीर बलरामपूरच्या महाराजगंज पोलिस स्टेशन परिसरातील गुलहरीचा रहिवासी आहे. आणि मुंबईच्या वांद्रे भागात कोंबडीच्या दुकानात काम करायचा. पण लॉकडाऊन दरम्यान मार्चमध्ये लखनौला परतला. आयशाच्या हत्येनंतर समीरने बाजारातून चादर आणली आणि मृतदेह पॅक करण्यासाठी इतर साहित्य खरेदी केले. त्याच रात्री मृतदेहाचे सहा तुकडे ब्रीफकेस आणि बॅगमध्ये भरून कारमधून घेतले आणि महामार्गावर फेकले.

अशाप्रकारे झााला खुलासा

बाराबंकीचे एसपी डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, ज्या ब्रीफकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यामध्ये पोलिसांना दोन महत्त्वपूर्ण संकेत सापडले. पहिली बॅगमध्ये आरोपीची जीन्स होती. ज्यात लखनौच्या उद्यानात जाण्यासाठी लागणारी तिकिटं आणि बॅगेत ठेवलेले वीज बिल होते. हे बिल इतके जुने होते की त्यावरील केवळ काही आकडे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी या दोन पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.


विजेचे बिल एका महिलेच्या नावे होते. पोलिसांनी महिलेकडे पोहोचताच तिने समीरला घर विकल्याचे सांगितले. इथूनच पोलिसांना समीरचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा तपशील शोधला आणि त्याच्या ठीकानाबाबत चौकशी केली. मात्र, आरोपींनी तो मोबाइल बंद केला होता. असे असूनही, पोलिसांना आरोपींचा नवीन नंबर मिळाला. आणि आरोपीला अटक केली. एसपीने सांगितले की, आरोपी समीर खान नेपाळला पळ काढत होता.

Web Title: The husband was preparing to flee to Nepal by cutting his wife into six pieces but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.