सरस्वती मनोज साने याला काका म्हणायची, तरीही ती त्याच्यासोबत का रहायची?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:17 PM2023-06-09T15:17:17+5:302023-06-09T15:17:37+5:30

मीरा रोडवर काल झालेल्या हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

saraswati vidya horror killing case orphanage worker says she told us he was her uncle | सरस्वती मनोज साने याला काका म्हणायची, तरीही ती त्याच्यासोबत का रहायची?

सरस्वती मनोज साने याला काका म्हणायची, तरीही ती त्याच्यासोबत का रहायची?

googlenewsNext

मुंबईतील मीरा रोड येथील एका सोसायटीत काल महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या मृतदेहाचे कटरने अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आता सरस्वतीच्या मैत्रिणीनेही मोठा दावा केला आहे. 

पोलीस अधिकारी आरोपींची चौकशी करत आहेत. मात्र, सरस्वतीने आत्महत्या केली होती असा दावा आरोपीने केला आहे. आता याप्रकरणी सरस्वतीच्या एका मैत्रिनीने मोठा खुलासा केला आहे. अनाथाश्रमातील सरस्वतीची मैत्रीण असलेल्या एका महिलेने खुलासा केला आहे की, तिने आम्हाला सांगितले की तो तिचा मामा आहे. सरस्वतीमध्येआणि माझ्यात वडील-मुलीचे नाते होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नव्हते, असा दावाही आरोपीने केला आहे. 

मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

५६ वर्षीय मनोज साने याने ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अपार्टमेंटच्या झडतीदरम्यान पोलिसांना बादल्या आणि जवळपास सर्व खोल्यांमध्ये मृतदेहांचे तुकडे सापडले. एवढेच नाही तर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये तुकडेही उकळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री उशिरा रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालताना दिसला. 

सरस्वती अहमदनगरच्या जानकीबाई आपटे बालिकाश्रमात राहत होती. अनाथाश्रमातील एका महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरस्वतीने त्यांना सांगितले होते की ती तिच्या काकांकडे राहत होती. अनु साळवे यांच्या म्हणण्यानुसार, "तिने आम्हाला सांगितले की त्यांचे काका मुंबईत राहतात आणि मी त्यांच्यासोबत राहते. तो व्यक्ती कापड व्यापारी आणि खूप श्रीमंत आहे."

या संदर्भात आरोपीनेबी अनेक खुलासे केले आहेत. सरस्वती मला माझ्या मुलीसारखी होती, त्यामुळे आमच्यात शारीरीक संबंध नव्हते, असा खुलासा आरोपीने केला. 

सरस्वती दोन वर्षांपूर्वी अनाथाश्रमात गेल्या होत्या आणि त्या वेळी त्या खूप उदास दिसत होती. मनोज साने विवाहित नसल्याचे तिने सांगितले. मुंबईतील बोरिवली येथे त्यांचे घर आहे, तेथे त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य राहतात, मात्र ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. तो बोरिवलीतील एका किराणा दुकानात कामाला होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी साने काम करत असलेल्या दुकानात वारंवार जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये सरस्वती आणि मनोज साने यांची मैत्री झाली आणि त्यानंतर २०१६ मध्ये ते एकत्र राहू लागले. तीन वर्षांपूर्वी तो मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला होता.

Web Title: saraswati vidya horror killing case orphanage worker says she told us he was her uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.