शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

संजय काकडे यांना अटक आणि जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:12 IST

गुंड गजानन मारणेला मदत करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तळोजा तुरुंगातून सुटलेला गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या कटात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे काही तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने काकडे यांची २५ हजार रुपये रोख व १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सायंकाळी ५ वाजता सुटका केली.तळोजा कारागृहातून १५ फेब्रुवारी रोजी सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची त्याच्या साथीदारांनी सुमारे ३०० मोटारींच्या ताफ्यासह मिरवणूक काढली होती. त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्यानंतर गुंड मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणात २३ फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष शाखेच्या सोशल मीडिया सेलचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी फिर्याद दिली होती. संघटित गुन्हेगारांना पडद्याआडून मदत केल्याच्या संशयावरुन गेल्या महिन्यात २३ मार्च रोजी पोलिसांनी संजय काकडे यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.गजानन मारणे व त्यांच्या समर्थकांची जनतेचे मनामध्ये दहशत रहावी, म्हणून कट करून यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून सुनियोजनपूर्वक तळोजा जेल ते कोथरूड अशा वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद केले होते.काकडे व मारणे यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्याअनुषंगाने काकडे यांच्याकडे सखोल तपास करायचा असून त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. पी. सावंत यांनी केली.काकडे यांच्यावतीने अ‍ॅड. चिन्मय इनामदार आणि अ‍ॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. महापालिका निवडणुका जवळ आल्याने मागील निवडणुकीतील काकडे यांचा सहभाग पाहून केवळ राजकीय द्वेषापोटी हा खोटा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली आहे. काकडे यांचा मारणेशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रतिमा मलिन करण्यासाठीपुणे महापालिका निवडणूक आठ - नऊ महिन्यांवर आली आहे. गेल्या निवडणुकीत मी केलेले काम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच गजानन मारणेच्या रॅलीप्रकरणी मला अटक केली. मात्र, मला न्यायदेवतेवर विश्वास होता. न्यायदेवतेने अखेर मला न्याय दिला. परंतु, हे प्रकार त्यांनी थांबवावेत अन्यथा, माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचे मटेरियल तयार आहे. ते बाहेर काढावे लागेल.  - संजय काकडे, माजी खासदार 

टॅग्स :Sanjay Kakdeसंजय काकडे