शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

देगलूरच्या तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 18:55 IST

दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या

ठळक मुद्देविशेष म्हणजे  मागील चार महिन्यांपासून वाळू घाट बंद आहेत.

देगलूर (जि. नांदेड) : तालुक्यातील वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर वाळू माफियांनी दगडाचा वर्षाव केला. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास नांदेड-हैदराबाद मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर घडली. 

देगलूर तालुक्यातील वाळू घाटावरून महसुल प्रशासनातील काही शुक्राचार्यांना हाताशी धरून अनेक वाळूमाफिया वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळूचा उपसा करुन मोठी कमाई करून घेत आहेत. विशेष म्हणजे  मागील चार महिन्यांपासून वाळू घाट बंद आहेत. मागील एक महिन्यापासून वाळू माफियात अवैधरीत्या वाळूचा उपसा करण्यासाठी जणू स्पर्धा लागली होती. मंगळवारी रात्री वाळू घाटावरून उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार अरविंद बोळंगे, मंडळ अधिकारी गणेश कोनुले, तलाठी लक्ष्मण बेंजलवार यांनी नरगंल रोडवरील हवरगा पानंद रस्त्यावरून वाळुची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (एम. एच.२६ ए.डी.६७८२) पाठलाग केला.

शहरातील मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर वाळुचे वाहतुक करणारे वाहन येताच तहसीलदार अरविंद बोळंगे वाहन थांबवून त्याच वाहनात चालकाच्या बाजूस बसले तर चालक पळून जावू नये म्हणून मंडळ अधिकारी गणेश कोनुले हे वाहनाच्या बाजूने रस्त्यावरच उभे राहिले. तेवढ्यात शेख अहेमद व सिध्दी बाबा सिध्दी खाजा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तहसीलदार बसलेल्या वाळुच्या वाहनावरच दगडाचा वर्षाव केला. पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी  घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दगडफेकीत वाळूची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनाचा काचा फुटल्या. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या तक्रारीवरून शेख अहेमद व सिध्दी बाबा सिध्दी खाजा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. 

वाळू माफिया निर्ढावलेवाळू माफियांना राज्याश्रय व महसूल प्रशासनातील काही शुक्राचार्याची साथ मिळत असल्याने वाळू माफिया निर्ढावले आहेत. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयासमोरच मंडळ अधिकारी सखाराम ठाकरे यांनी वाळुचा ट्रक पकडला असताना त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ला केला होता. तसेच काही महिन्यापुर्वी अवैधरीत्या वाळुची वाहतूक करणारे टॅक्टर एका पोलिसांनी पकडले असताना एका निवृत्त पोलीस उपअधीक्षकाने त्या पोलिसास मारहाण करण्याची घटना घडली होती. आता तहसिलदारावरच दगडफेक केल्याने देगलूर तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूCrime Newsगुन्हेगारीTahasildarतहसीलदारRevenue Departmentमहसूल विभाग