शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! दोन तासांत शोधून दिले डिक्कीत विसरेलेले सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:59 IST

सुटकेसमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट असा सर्व ऐवज सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : एका प्रवाशाचे कारमध्ये विसरलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अवघ्या दोन तासांत पोलिसांनी शोधून दिले. बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ही कार्यक्षमता दाखवली असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून शनिवारी देण्यात आली. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विरारच्या बोळींज नाका येथे राहणारे निलेश सोनी (२८) हे बोळींज पोलीस ठाण्यात आले. शुक्रवारीच घरी लग्न सोहळा असल्याने त्यांनी लग्न सोहळ्यातील सोन्याचे दागिने व कपडे सुटकेसमध्ये भरून घेत बोळींज नाका येथून भाड्याने एक आर्टिका कार केली. त्याच कारच्या डिक्कीत त्यांनी दागिने ठेवले आणि नातेवाईकांसह विरार ओव्हर ब्रीज जवळील चिमई हॉलवर पोहचले. पण कारच्या डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिने व कपड्यांची बॅग कारमध्येच विसरल्याचे त्यांनी सांगितले.

निलेश सोनी यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लागलीच त्या कारचा व कारचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या कारचा शोध घेतला. तो कारचालक कारसह वसईच्या गोखिवरे येथे सापडला. कार चालकाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्याने त्याच्या कारच्या डिक्कीतील सुटकेसबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर डिक्की उघडून सुटकेस काढून दिली. पोलिसांनी सुटकेस उघडल्यावर त्यात अडीच लाख रुपये किंमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट असे सोन्याची सापडले. बोळींज पोलिसांनी हे सोन्याचे दागिने निलेश सोनी यांना अवघ्या दोन तासांत सुपूर्द केले आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले.

टॅग्स :PoliceपोलिसGoldसोनं