शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

लव्ह जिहादचा आरोप करीत विवाहच उधळून लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 7:41 AM

Love jihad: लग्न करण्यासाठी आलेली वधू या दडपणामुळे आल्यापावली परत गेली.

लखनाै : बळजोरीने धर्मांतर केल्याचा व लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी एक विवाह उधळून लावला.  लग्न करण्यासाठी आलेली वधू या कार्यकर्त्यांच्या दडपणामुळे आल्यापावली परत गेली.करणी सेना ही हिंदुत्ववादी संघटना आहे. बलियाचे पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांनी सांगितले की, आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार वधूपित्याने पोलिसांत दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतले व वडिलांच्या ताब्यात दिले.   करणी सेनेचे कार्यकर्ते न्यायालय परिसरात जाऊन या वधूवर प्रश्नांची सरबत्ती करीत असल्याचा एक व्हिडिओ झळकला आहे. आपण दिलशाद सिद्दीकी (२४ वर्षे) या युवकाशी  विवाह करणार असल्याचे ही वधू करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसते. तुझे नाव काय? तू कोणत्या ज्ञातीतील आहेस? ज्याच्याशी लग्न करते आहेस तो मुलगा परधर्मातील आहे का, तू त्याच्याशी लग्न का करीत आहेस, अशाही प्रश्नांची सरबत्ती करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी वधूवर केली.वधूने मी दलित समाजातील  असून, सज्ञान आहे व स्वत:च्या इच्छेने हा विवाह करीत आहे असे उत्तर  दिलेले व्हिडिओत पाहायला मिळते. या संघटनेने दिलशादला धमकाविल्याने त्याने विवाह न करताच काढता पाय घेतला. काही कार्यकर्त्यांनी वधूला पोलीस ठाण्यात गाठले. ज्या आई-वडिलांनी तुला मोठे केले, शिक्षण दिले, त्यांच्याशी तू असे का वागत आहेस,  असा जाब तिला विचारला.  

वडिलांची तक्रारवधूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिलशाद सिद्दीकीविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आपली मुलगी दोन दिवस घरी आलेली नाही. तिचा विवाह बळजोरीने दिलशादशी लावला जात आहे असा वडिलांचा आरोप होता. बुधवारी करणी सेनेने घातलेल्या गोंधळानंतर संध्याकाळी वडिलांनी तक्रार केली होती.

टॅग्स :marriageलग्नLove Jihadलव्ह जिहादCrime Newsगुन्हेगारी