शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Injection : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, डॉक्टरसह तीन वार्डबॉयला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 00:16 IST

Remdesivir Injection: गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत होती. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली होती.

नागपूर : कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करीत असतानाच नागपूर शहर पोलीसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. यात डॉक्टरसह तीन वार्डबॉयला अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत होता. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली होती. पोलीस आयुक्तांनी गांभिर्याने घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते. काळाबाजारीवर लक्ष ठेवून असलेल्या पोलीसांना कामठीमध्ये आशा हॉस्पीटलचे डॉ. लोकेश साहू यांच्याकडे १६ हजार रुपयात एक रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. पोलीस आयुक्तांनी झोन ५ चे डीसीपी निलोत्पल यांना कारवाईचे निर्देश दिले. निलोत्पल यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून डॉ. साहू यांच्याशी संपर्क केला. डॉ. साहू ने दोन रेमडेसिविर असल्याचे सांगितले. डमी ग्राहकाला डिलीव्हरी करताना पोलीसांनी डॉ. साहू याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर प्रतापनगर येथील स्वस्थम हॉस्पीटलमधील दोन वार्डबॉय जवळ रेमडेसिविर असल्याचे सांगितले.

निलोत्पल यांनी स्वस्थम हॉस्पीटलच्या वॉर्ड बॉयशी संपर्क साधला. ते सुद्धा रेमडेसिविरची विक्री करण्यास तयार झाले. त्यांनासुद्धा रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्यांची कसून चौकशी करीत असताना हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पीटलमध्ये एक वॉर्डबॉय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खुलासा झाला. पोलीसांनी शालिनीताई मेघे हॉस्पीटलच्या त्या वॉर्डबॉयला सुद्धा ताब्यात घेतले. त्याच्याकडे ६ इंजेक्शन मिळाले. पोलीस पथक रात्री उशीरापर्यंत डॉ. साहू व तीन वॉर्डबॉयची चौकशी करीत होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले की आरोपींच्या चौकशीत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारीचा मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे.- रुग्णांना इंजेक्शन लावण्यात येत नाही

सुत्रांच्या माहितीनुसार रॅकेटमध्ये डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. कोरोना वार्डात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. याचा फायदा घेत कर्मचारी रेमडेसिविरची चोरी करतात. ज्या रुग्णाच्या नावावर इंजेक्शन मागविण्यात येते, त्याला लावण्यात येत नाही. इंजेक्शनची काळाबाजारी करून त्याला १० ते २० हजारात विक्री करतात. या रॅकेटची कसून चौकशी केल्यावर अनेक खुलासे होवू शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस