शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात

By पूनम अपराज | Published: September 28, 2020 06:48 PM2020-09-28T18:48:41+5:302020-09-28T18:52:00+5:30

नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे.

The reason behind the meeting was secret, IPS vishwas Nagre Patil met to Sharad Pawar | शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात

शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई आल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत त्यांची ही पहिलीच भेट होती. शरद पवार आणि नांगरे पाटील यांच्यात मुंबईतील कायद्या आणि सुव्यवस्थेवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. नरिमन पॉंईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्यात काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.



विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांगरे पाटलांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबई आल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत त्यांची ही पहिलीच भेट होती. शरद पवार आणि नांगरे पाटील यांच्यात मुंबईतील कायद्या आणि सुव्यवस्थेवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला, वायबी चव्हाण सेंटरमध्ये चर्चा | Sharad Pawar meets Vishwas Nangare Patil at YB Chavan Centre

नांगरे पाटील यांची मुंबईतून कोल्हापूरला बदली झाली होती. त्यानंतर कोल्हापूरमधून नाशिकला बदली झाली होती. नाशिकमध्ये कर्तव्य पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा नांगरे पाटलांनी मुंबई गाठली आहे. यापूर्वी देखील नांगरे पाटील यांनी मुंबई पोलीस दलात काम केले आहे. नांगरे पाटील नाशिकमधून निरोप घेताना भावुक झाले होते. दरम्यान, त्यांनी नाशिकरांसाठी एक ऑडिओ संदेश शेअर केला होता. नाशिक शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शहरात काम करताना इथली माती, इथली माणसं, पाणी, निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. मात्र, हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. जय हिंद, असं म्हणून विश्वास नांगरे पाटलांनी नाशिककरांचा भावुक निरोप घेतला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

 

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

 

 

Web Title: The reason behind the meeting was secret, IPS vishwas Nagre Patil met to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.