हातपाय बांधून तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:37 PM2021-09-28T18:37:25+5:302021-09-28T18:40:58+5:30

Rape Case : लग्नाचे देखील दाखवले आमिष

Rape of a young woman with her hands and feet tied; Blackmailing by video call | हातपाय बांधून तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेलिंग

हातपाय बांधून तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेलिंग

Next
ठळक मुद्देपीडित तरुणी उस्मानाबाद येथे २०१६ मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला असताना ती तेथील विद्यार्थ्यांना मिरज, जि.सांगली येथे एक महिन्यासाठी प्रशिक्षणाला घेऊन गेली होती.पीडीत तरुणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणीवर जळगाव, पुणे, औरंगाबाद,पाळधी, मिरज जि.सांगली येथे हॉस्पिटल, लॉजसह वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार करणाऱ्या संपत लक्ष्मण मल्हाड (रा.दरिबडची,ता.जत, जि.सांगली) या तरुणाविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत तरुणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असून बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे.


पीडित तरुणी उस्मानाबाद येथे २०१६ मध्ये लेक्चरर म्हणून नोकरीला असताना ती तेथील विद्यार्थ्यांना मिरज, जि.सांगली येथे एक महिन्यासाठी प्रशिक्षणाला घेऊन गेली होती. तेथे संपत मल्हाड या तरुणाशी तिची ओळख झाली. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून त्याने बलात्कार केला. तेथील प्रशिक्षण संपल्यानंतर पीडिता २०१७ मध्ये पुण्यातील भारती विद्यापीठात नोकरीला लागली. तेथे देखील तरुणाने वेळोवेळी बलात्कार केला. याच काळात त्याने घराच्या कामासाठी ३५ हजार व दुसऱ्यावेळी ७० हजार रुपये घेतले. त्यानतर जळगाव, पाळधी येथे अत्याचार केला. २०१९ मध्ये गर्भवती राहिल्याने पाळधी ये‌थे रुग्णालयात नेऊन गर्भपात केला. त्यानंतर २०२० मध्ये संपतने दुसरीशी लग्न केले.त्यावेळी पीडितेने त्याच्याशी संपर्क कमी केला. मात्र या काळात तो व्हिडीओकॉल करुन ब्लॅकमेलिंग करु लागला. औरंगाबाद येथे बोलावून त्याने पुन्हा अत्याचार केला. ६ सप्टेबर २०१२ रोजी देखील त्याने जळगावात पांडे चौकात मैत्रीणीच्या खोलीवर हातपाय बांधून जबरदस्तीने अत्याचार केला. तू दुसऱ्याची होऊ शकत नाही म्हणून सतत धमकी देऊन अत्याचार करीत असल्याने पीडितेने कुटुंबाला माहिती दिली. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.

Web Title: Rape of a young woman with her hands and feet tied; Blackmailing by video call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app