Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:42 IST2025-10-05T14:39:41+5:302025-10-05T14:42:26+5:30
Teacher Raped by 4 Men: एका शिक्षिकेला पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत चार जीम ट्रेनर्संनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
Crime News Gurgaon: परदेशी भाषा शिकवणाऱ्या एका २९ वर्षीय शिक्षिकेसोबत मैत्री केली. तिचा विश्वास संपादन केला आणि थेट पार्टीचे निमंत्रण दिले. शिक्षिका मित्रावर विश्वास ठेवून तिथे गेली, पण जे घडलं तिच्या मनावर मोठा आघात झाला. आधी मित्राने आणि नंतर त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
२९ वर्षीय शिक्षिका विवाहित असून, ती दिल्लीतील एका शाळेत परदेशी भाषा शिकवते. ती तिच्या पतीसह राहते.
पार्टीमध्ये भेटला होता गौरव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेची आरोपी गौरवसोबत एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यांच्या गप्पा झाल्या. त्यावेळी दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यानंतर अनेकदा दोघे भेटले. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
पार्टीचे निमंत्रण, तीन मित्रांना कॉल
१ ऑक्टोबर रोजी गौरवने शिक्षिकेला कॉल केला आणि पार्टीसाठी येण्याची विनंती केली. शिक्षिका बाहेरच होती, त्यामुळे तिने होकार दिला.
गौरवने शिक्षिकेला त्याचा मित्र नीरजच्या घराचा पत्ता पाठवला. शिक्षिका मध्यरात्री तिथे पोहोचली. काही वेळाने गौरवने तिच्यावर जबरदस्ती करणे सुरू केले. तिच्या अत्याचार केला. गौरवने नीरज आणि इतर दोन मित्रांनाही बोलावून घेतलं. त्यानंतर तिघांनीही शिक्षिकेवर आळीपाळीने बलात्कार केला.
आरोपींची ओळख पटली
शिक्षिकेने या घटनेनंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. २ ऑक्टोबर रोजी सकाळी तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
गौरव (वय ३७, हिमाचल प्रदेश), योगेश, (वय २९) आणि अभिषेक (वय २८, महेंद्रगड) आणि नीरज (वय ३२, प्रयागराज, उत्तर प्रदेश) यांना अटक केली. हे चौघेही जीम ट्रेनर म्हणून काम करतात.
पोलीस अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.