Rape: 15 people raped two sisters for 6 days and made a objectionable video | Rape : १५ जणांनी दोन बहिणींवर ६ दिवस केला बलात्कार अन् बनविला व्हिडीओ

Rape : १५ जणांनी दोन बहिणींवर ६ दिवस केला बलात्कार अन् बनविला व्हिडीओ

ठळक मुद्देgeo.tv च्या अहवालानुसार 15 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की सहा दिवसांत मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.

आपल्या पोटच्या मुलींवर सहा दिवस बलात्कार केल्याचा आरोप पाकिस्तानमधील एका महिलेने केला आहे. पीडित मुलींचे वय 15 वर्षे आणि 17 वर्षे असे सांगितले गेले आहे. या दोघी बहिणी असून या मुलींचे 11 जणांनी एकत्र अपहरण केले होते. मुलीला फैसलाबादच्या परिसरात ठेवण्यात आले होते. या घटनेसंदर्भात पाकिस्तानमधील लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या अटकेची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


geo.tv च्या अहवालानुसार 15 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की सहा दिवसांत मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की 11 सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलींचे अपहरण झाले होते. पीडितेची आई म्हणाली की, आरोपी माझ्या मुलींना नशेत ठेवत असत. आरोपींनी पीडित मुलींचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओही रेकॉर्ड केले. एफआयआरनुसार, १५ वर्षाची मुलगी फैसलाबादमधील जंग बाजार येथे घटनेनंतर सोडण्यात आली, तर तिच्या बहिणीला गुजरानवाला येथे सोडण्यात आले.


पीडित मुलींच्या आईने सांगितले की, गरीबीमुळे ते कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत, म्हणूनच त्यांनी ठरविले की, ते घर सोडून इतरत्र राहण्यास जातील. मात्र पुढे आईने सांगितले की, घटनेनंतरही आरोपींनी मुलींचा पाठलाग केला.

Web Title: Rape: 15 people raped two sisters for 6 days and made a objectionable video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.