शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कुंपणच शेत खात होतं! कारागृहातील 3 अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीची तक्रार; धंतोलीत गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 2:03 PM

Extortion Case : दोन महिन्यातील दुसरी घटना मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देपैसे दिल्यास अधिकारी कैद्यांना मटन, चिकन, पत्ते, गाद्या, दारू, गांजा, मिठाई, मोबाईल, असे सर्वच उपलब्ध करून देत होते. कारागृहात कैदी चक्क जुगारही खेळत होते. लोकमतने त्यावेळी स्टिंग ऑपरेशन करून हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता.

नागपूर : हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या कैद्याला धमकी देऊन त्याच्याकडून एक लाख, आठ हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून नागपूर मध्यवर्ती कारागृहात सात वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या तीन तुरुंग अधिकाऱ्यांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडींमुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 कृष्णा चौधरी, गुलाब खरडे आणि रवींद्र पारेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या तुरूंग अधिकाऱ्यांची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, चौधरी सध्या नाशिक, खरडे अमरावती, तर पारेकर पुण्याच्या कारागृहात कार्यरत आहेत. २०१३ ते २०१५ या कालावधीत हे तीनही अधिकारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कार्यरत होते. यावेळी हत्या केल्याच्या आरोपात मदनकुमार बाबुलालजी श्रीवास (वय ६२) हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आरोपी मध्यवर्ती कारागृहात अंडर ट्रायल कैदी म्हणून बंद होता. त्याला त्यावेळी बडी गोल मध्ये ठेवण्यात आले होते. तेथून सेपरेट गुन्हाखाना येथे ठेवण्यासाठी आणि अन्य काही सुविधा देण्यासाठी तत्कालीन तुरुंग अधिकारी कृष्णा चौधरी, गुलाब खरडे आणि रवींद्र पारेकर या तिघांनी श्रीवास याला १ लाख,  ८ हजार, ५०० रुपयांची खंडणी मागितली. त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली. कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर श्रीवासने या संबंधाने उच्च न्यायालयात तक्रार वजा याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाची कसून चौकशी झाली. त्यानंतर २४ सप्टेंबर २०१४ ते २४ एप्रिल २०१५ या कालावधीत उपरोक्त अधिकाऱ्यांनी श्रीवासला धमकी देऊन खंडणी मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून धंतोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिन्यातील दुसरी घटना मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी तृतीयपंथी उत्तम सेनापती याच्या तक्रारीवरून सहा अधिकार्‍यांविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता.'लोकमत'ने उघड केली होती अनागोंदीनागपूरच्या कारागृहात २०१२ ते २०१५ या कालावधीत प्रचंड अनागोंदी कारभार होता. पैसे दिल्यास अधिकारी कैद्यांना मटन, चिकन, पत्ते, गाद्या, दारू, गांजा, मिठाई, मोबाईल, असे सर्वच उपलब्ध करून देत होते. कारागृहात कैदी चक्क जुगारही खेळत होते. लोकमतने त्यावेळी स्टिंग ऑपरेशन करून हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन अनेक अधिकाऱ्यांवर त्यावेळी शासनाने कारवाईदेखील केली होती.

टॅग्स :ExtortionखंडणीnagpurनागपूरjailतुरुंगPoliceपोलिस