शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कोर्टाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा, कोर्टातूनच फरार झाला बलात्काराचा दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 12:08 IST

Life imprisonment accused absconding from court : ही घटना राजगढ जिल्हा कोर्ट परिसरातील आहे. इथे पॉस्को अ‍ॅक्टनुसार अल्पवयीनसोबत बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय देत दोषी जितेंद्र भील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्हा कोर्टाने पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत बलात्काराच्या एका दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकून दोषीच्या पायाखालजी जमीन सरकली. धक्कादायक बाब म्हणजे दोषी जितेंद्र भील शिक्षा ऐकताच न्यायालयातून फरार (Life imprisonment accused absconding from court) झाला. पोलिसांनी दोषीचा सगळीकडे शोध घेतला. पण तो काही पोलिसांच्या हाती लागला नाही.

ही घटना राजगढ जिल्हा कोर्ट परिसरातील आहे. इथे पॉस्को अ‍ॅक्टनुसार अल्पवयीनसोबत बलात्कार केल्याप्रकरणी कोर्टाने निर्णय देत दोषी जितेंद्र भील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकताच कोर्टाच्या कर्मचाऱ्याला धक्का देत  जितेंद्र फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही. (हे पण वाचा : शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाला पाच वर्षांची शिक्षा)

असे सांगितले जात आहे की, दोन वर्षाआधी जितेंद्र भीलने मानसिक दिव्यांग मुलीवर बलात्कार केला होता. तेच जेव्हा अल्पवयीन गर्भवती झाली तेव्हा कुटुंबियांनी विचारल्यावर तिने या घटनेबाबत सांगितले. यानंतर २०१८ मध्ये अल्पवयीन पीडितेला घेऊन कुटुंबिय पोलिसांकडे गेले आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जितेंद्र भील याला अटक केली आणि कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर तो चक्क कोर्टातून फरार झाला. (हे पण वाचा : जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याने पीडितेला जिवंत जाळले, आरोपीचे कुकृत्य CCTVमध्ये कैद झाले)

 

डीपीओ(सरकारी वकिल) आलोक श्रीवास्तव म्हणाले की २ ऑक्टोबर २०१८ ला पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली होती की, तिची मुलगी मनोरूग्ण आहे. आरोपी जितेंद्र भील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत राहिला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा ती गर्भवती असल्याचं समजलं. ती १३ आठवड्यांची गर्भवती होती. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण तो कोर्टातून फरार झाला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय