धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:29 AM2021-07-08T10:29:59+5:302021-07-08T10:34:05+5:30

Crime News : आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले.

raigarh thug took huge amount from bank account farmers through atm card fraud | धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

धक्कादायक! ATM कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यातून 'त्याने' काढले तब्बल 8 लाख; असा झाला पर्दाफाश

googlenewsNext

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून फसवणुकीच्या प्रकरणातून एटीएम कार्ड आणि तब्बल 7 लाख 95 हजार 510 रुपये जप्त करण्यात आले आहे. हा आरोपी सेवा सहकारी संस्थेत कामाला होता. एटीएम कार्ड (ATM Card) वाटण्याची जबाबदारी या आरोपीला देण्यात आली होती. याच दरम्यान हिरालाल चौधरी नावाचे एक शेतकरी त्यांना पैशांची गरज असल्याने बँकेत पोहोचले. बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना बँक व्यवस्थापनाने त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचं सांगितलं. खात्यात पैसे नसल्याची (Bank Fraud) माहिती मिळताच चौधरी यांना मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 4 जून रोजी शेतकरी हिरालाल चौधरी यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून 5 लाख 45 हजार 510 रुपये काढले आहेत असं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणानंतर आणखी एका शेतकऱ्याने त्यांच्याही खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याची पोलीस तक्रार केली. त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने 2 लाख 50 हजार रुपये काढले होते.

पीडित शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज शोधले आणि संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या तपासात आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी सेवा सहकारी संस्थेत कार्यरत होता. त्याला शेतकऱ्यांना एटीएम वाटण्याची जबाबदारी होती. परंतु आरोपीने एटीएम कार्ड वाटण्याऐवजी ते स्वत:जवळच ठेऊन शेतकऱ्यांच्या खात्यातून लाखो रुपये उडवले. पोलिसांनी जवळपास 8 लाखांपर्यंतची रोख रक्कम जप्त करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितल्याने भावांकडून हातोडा, हेल्मेटने बेदम मारहाण; Video व्हायरल 

संपत्तीवरून अनेकदा कुटुंबीयांमध्ये वादविवाद होत असतात. काही वाद हे टोकाला देखील जातात. अशीच एक भयंकर घटना पाकिस्तानच्या पेशावरमध्ये घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बहिणीने संपत्तीत हिस्सा मागितला म्हणून भावांकडून हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल हन्नान या व्यक्तिच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होते. दोन्ही मुले आफताब आणि अर्षद यांनी आपल्या बहिणीला बेदम मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, बहिणीने दरवाजा उघडल्यानंतर दोन्ही भावांनी बहिणीला हातोडा आणि हेल्मेटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बहीण पडल्यानंतरही ते दोघे तिला मारहाण करत होते. घरातील एक वृद्ध महिला तिला वाचवण्याचा प्रयत्न करते. मात्र तिलाही धक्काबुक्की करण्यात येते. ही वृद्ध महिला त्यांची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी पेशावरमधील या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडे आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बहिणीने संपत्तीत वाटा मागितल्याने मारहाण केली असल्याचे आरोपींनी म्हटले आहे.

Web Title: raigarh thug took huge amount from bank account farmers through atm card fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.