जुगार अड्ड्यावर छापा, रोख आणि मोबाइलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:25 PM2020-05-05T21:25:50+5:302020-05-05T21:28:09+5:30

यशोधरानगर पोलिसांची कारवाई

Raid on Gambling, cash and mobiles seized worth rupees 3.25 lakhs pda | जुगार अड्ड्यावर छापा, रोख आणि मोबाइलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

जुगार अड्ड्यावर छापा, रोख आणि मोबाइलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

Next
ठळक मुद्देरोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाक्या असा एकूण ३ लाख, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २५ हजार, ३८५ रुपये, विविध कंपनीचे ६ मोबाईल आणि पाच मोटरसायकल असा एकूण ३ लाख, ३१ हजार, ३८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर : यशोधरा नगर पोलिसांनी भिलगावमध्ये चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर छापा घालून तेथे नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून रोख २५ हजार रुपये, मोबाईल आणि पाच दुचाक्या असा एकूण ३ लाख, ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 

यशोदानगर पोलीस ठाण्याचे पथक मंगळवारी दुपारी भिलगाव परिसरात गस्त करीत असताना त्यांना राजू किराणा स्टोअर्सला लागून असलेल्या एक बंद रूममध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक मोहिते, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, फौजदार प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक शिपाई नरेश मोडक, विजय लांजेवार आणि रत्नाकर कोठे आदींनी त्यारूम मध्ये छापा घातला आणि जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. नऊ आरोपी तेथे ताश पत्त्याचा जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख २५ हजार, ३८५ रुपये, विविध कंपनीचे ६ मोबाईल आणि पाच मोटरसायकल असा एकूण ३ लाख, ३१ हजार, ३८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे
राजेंद्र आनंदराव मेश्राम (भिलगाव), कुणाल एकनाथ भनारे (यशोदा नगर), विजेंद्र राघोजी रोकडे (गोकुळ नगरी, भिलगाव), पंकज उर्फ पप्पू घनश्याम फलके, शत्रुघ्न बाबुराव पारधी (खराळा, कपिल नगर) रवींद्र उर्फ रवी तेजराम कुमेरिया  (अग्रेसन नगर), रुपेश सदाशिव मानकर (भिलगाव), मनोहर गोविंदराव चौधरी आणि महेश निळकंठ वंजारी (रा. भिलगाव)


 

Web Title: Raid on Gambling, cash and mobiles seized worth rupees 3.25 lakhs pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.