शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

गांधी जयंतीनिमित्त कैद्यांना शिक्षेत सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 8:55 PM

महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले आहेत.

गणेश वासनिक अमरावती - केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांत असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने बंदीवान कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. कैद्यांना तीन टप्प्यांत याचा लाभ मिळणार आहे.महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम होत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्तीनुसार प्रस्ताव मागविले आहेत. कैद्याची कारागृहातील वागणूक, गुन्ह्याचे स्वरूप, पॅरोलवर सुटका, सुटी घेतल्यानंतर कारागृहात वापसी आदी महत्त्वाच्या बाबी तपासूनच प्रस्ताव पाठविण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. कैद्यांना शिक्षेत सूट देण्यासाठी तीन टप्पे पाडले आहेत. यात पहिला टप्पा २ आॅक्टोबर २०१८, दुसरा टप्पा ६ एप्रिल २०१९, तर तिसरा टप्पा २ आॅक्टोबर २०१९ असा केंद्र सरकारने निश्चित करण्यात आला आहे. पात्र कैद्यांची यादी कारागृह अधीक्षकांना शासनाकडे पाठवावी लागणार आहे. कैद्यांच्या शिक्षेत सूट मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव, कारागृह विभागाचे महानिरिक्षक आणि विशेष महानिरीक्षकांचा यात समावेश असणार आहे.

या कैद्यांना मिळणार सूटकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ५० टक्के शिक्षा पूर्ण झालेल्या ५५ वर्षानंतरच्या महिला कैदी, ६० वर्षानंतरचे पुरुष कैदी, ७० टक्के अपंगत्व असलेले दिव्यांग यांना सूट मिळेल. लिंग परिवर्तित कैदी असल्यास ५५ वर्षाची अट राहील. 

हे कैदी अपात्रफाशीची शिक्षा, जन्मठेपेचे कैदी, ताडा, पोटा, यूएपीए, रासुका, गैरकायदेशीर कारवाया, हुंडाबळी, बनावट नोटा, पोक्सोे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कृत्याखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सूट मिळणार नाही. 

गृहविभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी प्राप्त झाली. त्यानुसार कैद्यांचे प्रस्ताव पाठविले जातील. अटी-शर्तींच्या अनुषंगाने कैद्यांच्या नावांची छाननी सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात प्रस्ताव पाठविले जातील.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रjailतुरुंगCentral Governmentकेंद्र सरकारMahatma Gandhiमहात्मा गांधी