शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय...; १० हजारांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 5:27 AM

Crime News : उरण पोलीस ठाण्यात प्रमोद महाजन आणि पवन शरद पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन पनवेल : बांधकाम व्यावसायिक दिलेले पैसे परत देत नसल्याने एकाने शिवसेना भवन, दादर येथे अर्ज दिला होता. यावेळी अनोळखी इसमाने शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय, तुम्ही दहा हजार रुपये पाठवा असे सांगून दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण पोलीस ठाण्यात प्रमोद महाजन आणि पवन शरद पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उरण, बोरी नाका येथे राहणारे पंकज धारगळकर यांनी दिवा-ठाणे येथे महेश पटेल या बिल्डरच्या साई कनिष्क बिल्डर संस्थेकडून फ्लोरिडा बिल्डिंग येथे २०१७ मध्ये सातव्या माळ्यावर फ्लॅट विकत घेतला होता. त्या इमारतीचे बांधकाम बिल्डरने पूर्ण केलेले नाही. या बिल्डरला त्यांनी ३५ लाख रुपये दिले होते. विकत घेतलेल्या फ्लॅटचे आणि इमारतीचे काम बिल्डर पूर्ण करीत नसल्याने आणि दिलेले पैसे परत करीत नसल्याने पंकज यांनी शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या नावाने मार्च २०१९ रोजी अर्ज दिला. ७ एप्रिल रोजी पंकज घरी असताना त्यांना अनोळखी इसमाचा फोन आला.  यावेळी तुमचे अडकलेले पैसे साई कनिष्क बिल्डरकडून परत मिळवून देतो, त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर प्रमोद महाजन यांनी पंकज यांच्या व्हाॅट्सॲप अकाउंटला त्याचा सहकारी पवन शरद पाटील याच्या नावाने फोन पे अकाउंटचा क्यूआर कोड पाठविला. ७ एप्रिल रोजी प्रमोद महाजन याला पंकजने व्हाॅट्सॲप कॉल केला असता त्यांचा माणूस २०-२० लाखांचे दोन डीडी घेऊन निघाला असून, सायंकाळपर्यंत तुमच्याकडे पोहोचेल असे सांगितले. मात्र, कोणीही त्यांच्या घरी आले नाही. यावेळी पंकज यांनी शिवसेना नेते नांदगावकर यांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी शिवसेना भवन हे कोरोनामुळे बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणीतरी खोटी माहिती देऊन १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी