शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

हिंजवडीत धिंगाणा घालणारा पुण्यातील पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 6:59 PM

पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत पोलीस शिपायाने धिंगाणा केला.

पिंपरी : दारु न दिल्याचा राग आल्याने एका पोलीस शिपायाने तोडफोड केली. तसेच हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. पुणे शहर पोलीस दलातील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहन धुमाळ (वय २४, रा. भवानीपेठ, पुणे) असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार अजय विजय खोत (वय २८), मंगेश महेंद्र रोकडे (वय ३१), जयंत बालमुकुंद साळुंके (वय २९, सर्व रा. पोलीस वसाहत, भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमालक रामकिसन रमेश खैरनार (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.तीन साथीदारांसह अक्षय धुमाळ रविवारी (दि. ४) रात्री हिंजवडी येथे आला. आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणासाला त्यादिवशी दारू का दिली नाही, असे म्हणून त्यांनी रामकिसन यांना शिवीगाळ केली. पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत धुमाळ याने धिंगाणा केला. हॉटेल बाहेरच्या दुचाकींना लाथा मारून त्याने चायनीज दुकानाची काच फोडली. हा सर्व प्रकार सीसीटव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsuspensionनिलंबन