वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 16:05 IST2019-02-05T15:59:02+5:302019-02-05T16:05:33+5:30

शाळा, कॉलेज भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला आल्या होत्या.

Police take a action against Roadromiyos in the wakad areas | वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका

वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका

वाकड : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालय आवारात विद्यार्थिनींची टिंगल टवाळी करणाऱ्या ४० रोमियोवर त्यांच्या दहा दुचाकींसह कारवाई करण्यात आली.
    मंगळवारी (दि ५) दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या शाळा व महाविद्यालय आवारात फिरणाऱ्या  रोमियोंवर महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. या शाळा, कॉलेज भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला आल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी देखील अशा कारवाईवर भर द्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमएम स्कूल थेरगाव, एस एन बीपी, महर्षी विद्या मंदिर थेरगाव, बालाजी कॉलेज ताथवडे, खिंवसरा स्कूल या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी, नारायण सस्ते, उपनिरीक्षक अमित शेटे व पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Police take a action against Roadromiyos in the wakad areas