शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 22:08 IST

कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली.

जालना : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याचा संशय येताच एका फौजदाराने घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या फोजदाराने लाचेची रक्कम रस्त्यातच फेकून दिली. मात्र या पळून जाणाऱ्या फौजदाराला एसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यावेळी कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली.

गणेश शेषराव शिंदे असे लाच घेणाऱ्या फौजदाराचे नाव आहे. तक्रारदारास जालना शहरातील कदीम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला आहे. या प्रकरणात कलम ११० ऐवजी १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार गणेश शिंदे याने एक लाख रूपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पथकाने बुधवारी सकाळी जालना येथील कदीम पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. फौजदार शिंदे याने लाचेची मागणी करून ७५ हजार रूपये घेतले. परंतु, एसीबीच्या सापळ्याचा संशय आल्याने लाचेच्या रकमेसह शिंदे याने कारमधून पळ काढला. पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून शिंदे याला ताब्यात घेतले. यानंतर, त्याच्या कारची तपासणी केली असता घेतलेली लाचेची रक्कम वाटेत फेकून दिल्याचे समोर आले. पंचासमक्ष कारची तपासणी केली असता आतमध्ये ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड व तब्बल २५ तोळे सोने आढळून आले. संबंधित मुद्देमाल पथकाने जप्त केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोनि. नंदकिशोर क्षीरसागर यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक मारूती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नंदकिशोर क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. 

घराचीही झाडाझडतीफौजदार शिंदे राहत असलेल्या जालना शहरातील घराची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून झाडाझडती करण्यात आली. त्या घरामध्ये काही सापडले नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. तर हिंगोली जिल्ह्यातील घराची झाडाझडती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणJalanaजालनाPoliceपोलिस