Police announce reward of Rs 50,000 to anyone who provides information about the person who raped minor | चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची माहिती देणाऱ्यास पोलीस देणार ५० हजार 

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची माहिती देणाऱ्यास पोलीस देणार ५० हजार 

ठळक मुद्देदिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गर्ह मुक्षतेश्वर गावातून मुलीच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं.मुलीला तातडीने मेरठच्या एका खास रुग्णालयात आणले गेले आणि तिच्यावर एका शस्त्रक्रिया झाली.

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात सहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. घटनेला चार दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी मोकाट आहे. दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केले आहेत. तसेच हापूर पोलिसांना आरोपी दलपतचा फोटो हाती लागला असून त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी ५० हजार रुपयांचे इनाम जारी केले आहे. 

दिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गर्ह मुक्षतेश्वर गावातून मुलीच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं. एका दुचाकीस्वाराने तिला उचलून नेलं होतं. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.

वैद्यकीय तपासणीत बलात्काराची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुलीला तातडीने मेरठच्या एका खास रुग्णालयात आणले गेले आणि तिच्यावर एका शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिची प्रकृतीत स्थिर आहे, पण धोक्यापासून मुक्त नाही. “तिला दीर्घ कालावधीसाठी उपचारांची आवश्यकता असेल, आम्हाला आणखी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असू शकते,” असे मेरठ मेडिकल कॉलेज व रुग्णालयात प्रिन्सिपल एस. के. गर्ग यांनी सांगितले होते. 

 मुलीची प्रकृती स्थिर असली तरी तिचा जबाब घेणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, तिने आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच तयार करण्यात आले असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केला आहे. हापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव सुमन म्हणाले की, या प्रकरणी आमची सहा पोलिसांची पथके तपास करत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

 

अलिशान कारमधून गोव्यातील कुख्यात गुंडाची मडगावात एन्ट्री

Web Title: Police announce reward of Rs 50,000 to anyone who provides information about the person who raped minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.