शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

PNB Scam: "तुझ्यासाठी मुंबईचा तुरुंगच योग्य", लंडनमधील कोर्टाने दिले नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश

By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 4:40 PM

पीएमसी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

लंडन/मुंबई - पीएमसी बँकेला (Punjab National Bank Scam ) हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या (Nirav Modi )  प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नीरव मोदीसाठी मुंबईतील तुरुंग योग्य आहे, त्याच्याविरोधात भारत सरकारकडून देण्यात आलेले पुरावे त्याला दोषी ठरवण्यासाठी योग्य आहेत, असे सांगत लंडनमधील नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. (Court) त्यामुळे पंजाब नॅशन बँक घोटाळ्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईल मोठे यश मिळाले आहे. ( UK extradition judge orders Nirav Modi to be extradited to India to stand trial) 

 

हजारो कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत आज लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत कोर्टाने आपला निकाल सुनावला. यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, मी भारत सरकारकडून देण्यात आलेले सर्व साक्षीपुरावे स्वीकारले आहेत. नीरव मोदीला दोषी ठरवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत, त्यामुळे या पुराव्यांबाबत मी संतुष्ट आहे.

न्यायाधीश सॅम्युएल गोजी यांनी सांगितले की, नीरव मोदीला भारतामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील हे स्पष्ट आहे. दुसरीकडे नीरव मोदीने आपल्या बचावामध्ये दिलेले पुरावे परस्परांशी जुळत नाहीत. तसेच नीरव मोदीचे प्रत्यार्पण केल्यास त्याच्यासोबत न्याय होणार नाही याचा कुठलाही पुरावा दिसत नाही, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

यावेळी साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचेही निकाल देताना सांगितले. तसेच भारतामधील तुरुंगांची स्थिती ही चांगली असल्याचे सांगत त्याबाबत समाधान व्यक्त केले.  

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाNirav Modiनीरव मोदीIndiaभारतEnglandइंग्लंडCourtन्यायालय