शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:24 IST

Pappu Yadav And Lawrence Bishnoi : पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी याप्रकरणी आता मोठा खुलासा केला असून महेश पांडेय नावाच्या व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने वापरलेला मोबाईल आणि सिमही जप्त करण्यात आले आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पांडेय याचा कोणत्याही गँगशी काही संबंध नाही, त्याने याआधीही मोठ्या लोकांसोबत काम केलं आहे. जेव्हा महेशला पप्पू यादव यांच्याबाबतची माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळाली, तेव्हा त्याने युएईमध्ये राहणाऱ्या आपल्या मेव्हणीचं सिम कार्ड वापरून हा सर्व कट रचला. लवकरच या प्रकरणात आणखी खुलासे होतील.

काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी अभिनेता सलमान खानला लॉरेन्स गँगकडून मिळालेल्या धमकी संदर्भात पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लॉरेन्स गँगला आव्हान देत २४ तासांत त्याचं नेटवर्क उद्ध्वस्त केलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनंतर पप्पू यादव यांना एक कॉल आला जो महेशने स्वतः केला होता. यामध्ये पप्पू यादव यांना धमकी दिली. या धमकीनंतर त्यांनी केंद्राकडे आपली सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.

पप्पू यादव यांनी १३ ऑक्टोबरला ट्विट केलं होतं. एक गुन्हेगार सर्वांना धमकावत आहे. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख, आता उद्योगपती राजकारणी मारले गेले. कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिश्नोईसारख्या या गुन्हेगाराचं संपूर्ण नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त करेन असं म्हटलं होतं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक