शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनातील लोकांनी एकाला जिवंत जाळले, वादाचं धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:58 IST

Farmers Protest: शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी एका व्यक्तीला जिवंत जाळल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर तसेच इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. (Farmers Protest)दरम्यान, आता या आंदोलनातून अशीच एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणामधील बहादूरगड येथे शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी एका व्यक्तीला जिवंत जाळल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश असून, तो कसार गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. (The people in the farmer's movement burnt one person alive)

मुकेश याने काल संध्याकाळी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या चार जणांसोबत आंदोलनस्थळीच मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. त्या वादातून आरोपींनी मुकेश याच्यावर तेल ओतून आग लावली. आगीत गंभीररीत्या होरपळलेल्या मुकेशला बहादूरगड येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ९० टक्के भाजलेल्या मुकेशने अडीचच्या सुमारास प्राण सोडले.दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांकडून आपल्याला त्रास देण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तसेच मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीसोबतच सुरक्षेची हमी सरकारने द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गावापासून दूर नेऊन बसवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. सध्या डीएसपी पवन कुमार हे घटनास्थळी कुटुंबीयांची समजूत काढण्यामध्ये गुंतले आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला आहे तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यासाठी आवश्यक कारवाईलाही सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा