भयंकर! मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून आई-वडिलांनी लहान मुलीला 10 हजारांना विकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 13:41 IST2021-02-27T13:38:28+5:302021-02-27T13:41:02+5:30

Crime News : मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलीला शेजारी राहणाऱ्या 46 वर्षांच्या व्यक्तीला 10 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

parents sold 12 years old daughter for 10 thousand rupees | भयंकर! मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून आई-वडिलांनी लहान मुलीला 10 हजारांना विकलं अन्...

भयंकर! मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून आई-वडिलांनी लहान मुलीला 10 हजारांना विकलं अन्...

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी पैशासाठी आपल्या मुलीला विकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यामधील एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षीय मुलीला 10 हजारांत विकल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मोठ्या मुलीच्या उपचारासाठी लहान मुलीला विकल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलीला शेजारी राहणाऱ्या 46 वर्षांच्या व्यक्तीला 10 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

चिन्ना सुब्बैय्या असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याने मुलीला विकत घेतलं आणि तिच्यासोबत लग्न केलं आहे. आरोपी सुबैय्या या दाम्पत्याच्या शेजारी राहतो. त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आहे. त्यामुळे त्यांना दुसरं लग्न करायचं होतं. म्हणून त्यांनी हा सौदा केला. मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैशाची गरज असल्याने आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांनी आपल्या लहान मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. आरोपीने अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आणि तिला नातेवाईकांकडून घेऊन आला. त्यावेळी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर स्थानिकांनी याची चौकशी केली. 

स्थानिकांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारच्यांनी याची माहिती गावातील संरपंचाला दिली. त्यांनी तातडीने बाल कल्याण विभागाशी संपर्क साधला. महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची सुटका केली असून या मुलीला बाल आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. त्या ठिकाणी तिचं काउन्सिलिंग करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर तब्बल पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना रतननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. लग्नाच्या आमिष दाखवत आरोपीने आणि त्याच्या मित्रांनीही तरुणीवर पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: parents sold 12 years old daughter for 10 thousand rupees