four youngster raped girl for five years by pretending to marry in churu | नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

नात्याला काळीमा! लग्नाचं आमिष दाखवून अपहरण, 5 वर्षे केला बलात्कार: तरुणीने सांगितला धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली - राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर तब्बल पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना रतननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. लग्नाच्या आमिष दाखवत आरोपीने आणि त्याच्या मित्रांनीही तरुणीवर पाच वर्षे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीने या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये 22 वर्षीय तरुणीचे तिचा जवळचा नातेवाईक असलेल्या ओम प्रकाश याने लग्नाचं आमिष दाखवून अपहरण केलं होतं. तिला त्याने जयपूरला नेले. तेथील एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काही महिन्यांनी तरुणी गरोदर राहिली. आरोपीने तिला धमकावून गर्भपात करून घेतला. तक्रारीनुसार, ओम प्रकाशच्या भूलथापांना बळी पडलेली तरूणी तीन वेळा गरोदर राहिली. मात्र, तिन्ही वेळेला गर्भपात करून घेतला. आरोपी ओम प्रकाश काही दिवसांनी पसार झाला. 

ओम प्रकाशच्या मित्राने देखील जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, याच दरम्यानच्या काळात अन्य दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने स्वतःची सुटका करून घेत आपलं घर गाठलं. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ओम प्रकाश, रवी आणि अन्य दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संतापजनक! 20 वर्षीय तरुणीवर भाजपा पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यासह चार जणांनी सामूहिक बलात्कार (Rape) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहडोल जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी याप्रकरणी विजय त्रिपाठीचं (Vijay Tripathi) नाम समोर आल्यानंतर तात्काळ त्याला जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. सोबतच पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचं म्हटलं आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक मुकेश वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारू पाजली आणि 18 तसेच 19 फेब्रुवारीला तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी 20 फेब्रुवारीला पीडितेला तिच्या घरासमोरच गंभीर अवस्थेत फेकून निघून गेले. यानंतर पीडितेने 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


 

Web Title: four youngster raped girl for five years by pretending to marry in churu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.