बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:01 PM2020-06-06T17:01:08+5:302020-06-06T17:03:41+5:30

मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली.

Only one teacher was working in 25 schools, so far she has taken 1 crore salary | बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार

बापरे! एकच शिक्षिका २५ शाळांमध्ये करत होती नोकरी, आतापर्यंत घेतला १ कोटी पगार

googlenewsNext
ठळक मुद्देअनामिका शुक्ला जिल्ह्यातील कस्तूरबा विद्यालय फरीदपूर येथे विज्ञान विषयाची शिक्षक म्हणून कार्यरत होती. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत.. शुक्रवारी संध्याकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिल्यावर शनिवारी सकाळी ती राजीनामा देण्यासाठी बीएसए कार्यालयाबाहेर पोहचली.

शनिवारी, कासगंज पोलिसांनी उत्तर प्रदेशातील 25 शाळांमध्ये बनावट पद्धतीने नोकरी करणारी ठग शिक्षिका अनामिका शुक्लाला अटक केली. अनामिका शुक्ला जिल्ह्यातील कस्तूरबा विद्यालय फरीदपूर येथे विज्ञान विषयाची शिक्षक म्हणून कार्यरत होती. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत.

मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली. शुक्रवारी एक दिवसआधी मूलभूत शिक्षणाधिकाऱ्याने (बीएसए)  शिक्षिकेचा पगार थांबविण्याबाबत नोटीस जरी केली होती.

व्हॉट्स अ‍ॅपवर ही नोटीस पाठविली गेली. शुक्रवारी संध्याकाळी शिक्षिकेने ही नोटीस पाहिल्यावर शनिवारी सकाळी ती राजीनामा देण्यासाठी बीएसए कार्यालयाबाहेर पोहचली. तिने राजीनामाची एक प्रत आपल्यासोबत आलेल्या युवकामार्फत बीएसएला पाठविली.

बीएसएने शिक्षिकेविरूद्ध तक्रार दिली
त्या शिक्षिकेबद्दल या युवकास विचारणा केली असता त्याने सांगितले की,अनामिका शुक्ला बाहेर रस्त्यावर उभी आहे. यावर बीएसए अंजली अग्रवाल यांनी सोरों पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत तिला घेराव घातला.

पोलिसांनी तातडीने येऊन शिक्षिकेला अटक केली. यानंतर पोलिसांनी शिक्षिकेला सोरों कोतवाली येथे आणले. कोतवाली प्रभारी रिपुदमन सिंह यांनी सांगितले की, शिक्षिका अनामिका शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. बीएसएने शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.अनामिकाला गेल्या 13 महिन्यांत 25 कस्तुरबा गांधी गर्ल्स स्कूल (केजीबीव्ही) मध्ये सुमारे एक कोटी रूपये मानधन दिले गेले आहे. सर्व 25 केजीबीव्हीमधील मानधन समान बँक खात्यात गेले किंवा वेगवेगळ्या खात्यात भरले गेले, याची चौकशी केली जात आहे.

 

एटीएम कार्ड अडकले; बाहेर काढण्यासाठी तरुणाने मशीन तोडले

 

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

 

Lockdown : लॉकडाऊनमध्ये रुम दिला म्हणून रागाच्या भरात हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब

 

Read in English

Web Title: Only one teacher was working in 25 schools, so far she has taken 1 crore salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.