निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:34 PM2020-06-05T23:34:29+5:302020-06-05T23:39:27+5:30

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका गावकऱ्याने घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Cruel! The land mafia burned the woman alive, police admitted her to hospital | निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

Next
ठळक मुद्देमाहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सलेहा बेगम असे या महिलेचे नाव आहे.भूमाफिया तिची जमीन ताब्यात घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. सलेहाने त्याला जमीन हडपण्यापासून रोखले तेव्हा त्याने यापूर्वी अनेकदा जिवंत जाळण्याची धमकी दिली होती.

आसाममध्ये 50 वर्षीय महिलेला भूमाफियांनी जिवंत जाळले. हे प्रकरण राज्यातील होजाई जिल्ह्याशी संबंधित आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका गावकऱ्याने घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पीडित महिलेला तात्काळ  रुग्णालयात दाखल केले. सलेहा बेगम असे या महिलेचे नाव आहे.

याआधी धमकी दिली होती
पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित महिला सलेहा म्हणाली की, भूमाफिया तिची जमीन ताब्यात घेण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. सलेहाने त्याला जमीन हडपण्यापासून रोखले तेव्हा त्याने यापूर्वी अनेकदा जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. पण सलेहाने माघार घेतली नाही. हे प्रकरण टोकाला गेल्यानंतर गुंडांनी तिला जिवंत पेटवून दिले. त्यातूनही तिने तिचा जीव वाचवला आणि तेथून पळून गेली.

ही घटना मुराझार पोलिस ठाण्यांतर्गत दक्षिण सामाराली भागातील असून तेथील भूमाफिया या महिलेची जमीन हडपण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. जेव्हा महिला आणि तिचे कुटुंब घटनास्थळी पोहोचले आणि जमीन ताब्यात घेण्यास रोखले तेव्हा गुंडांनी महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
 

...म्हणून पत्नी आणि ३ मुलांची हत्या करुन बापाने केली आत्महत्या; सुुसाईड नोटमधून खुलासा

 

Coronavirus : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण; कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात हलवलं


व्हायरल व्हिडिओमुळे घटनेला वाचा फुटली 

व्हायरल व्हिडिओमध्ये गुंड जबरदस्तीने ट्रॅक्टरद्वारे जमीन नांगरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि जमीन मालक कुटुंब सतत त्याला रोखत आहेत. माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेसंदर्भात दोन एफआयआर मुराझार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. 

मुराझार पोलिस ठाण्याचे पोलिस कबीर लिंबू म्हणाले, 'आम्ही आतापर्यंत या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या आहेत. हे एफआयआर दोन्ही पक्षांनी केली आहे. 2019 मध्ये जमीन ताब्यात घेतल्याबद्दल रहिमुद्दीन नावाच्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रहिमुद्दीनचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Cruel! The land mafia burned the woman alive, police admitted her to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.