आता दाऊदच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:41 IST2019-04-25T18:40:33+5:302019-04-25T18:41:10+5:30
दाऊदच्या खेडमधील मालमत्तेवर सफेमाने टाच आणली आहे.

आता दाऊदच्या खेडमधील मालमत्तेचा लिलाव
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिण हसीना पारकरच्या एका फ्लॅटचा लिलाव १ कोटी ८० लाख रूपयांना झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव देखील केला जाणार आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणली आणि त्याचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर दाऊदच्या खेडमधील मालमत्तेवर सफेमाने टाच आणली आहे.
दाऊदच्या रत्नागिरीतील खेड येथील तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. दाऊद या बंगल्यात अनेक वेळा येऊन राहत असं म्हणतात. या मालमत्तांमध्ये एक पेट्रोलपं सोबत एक फ्लॉट देखील आहे. खेडमधील दोन मालमत्ता दाऊदची बहीण हसीना प्रकारच्या नावाने नोंद आहेत तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना बी आणि इतर भावंडांच्या नावे आहे. हे सगळे लोक १९८० दशकात खेडच्या बंगल्यात राहण्यास येत असत असं म्हणतात.
दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव
हसीना पारकरच्या नागपाडा येथील घरावर टाच; सफेमाची कारवाई