शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मटण पार्टी देऊन पळालेला कुख्यात गुंड प्रिंस एनकाउंटरमध्ये ठार; सुबोध सिंहचा होता राईट हँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:18 IST

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात दरोडेखोर प्रिंस उर्फ अभिजीत कुमार याचा पोलिसांनी एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे.

बिहारमधीलगुन्हेगारी विश्वाचा थरकाप उडवणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात दरोडेखोर प्रिंस उर्फ अभिजीत कुमार याचा पोलिसांनी एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे. वैशाली पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त कारवाईत प्रिंस मारला गेला, तर त्याचा एक साथीदार शस्त्रांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

धडाकेबाज कारवाई आणि चकमक 

वैशालीचे एसपी विक्रम सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंस हा सदर पोलीस ठाणे हद्दीतील दिघी येथील हनुमान नगरमधील एका घरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांनी परिसराला वेढा घातला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले असता, प्रिंसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रिंस गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सदर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांना दिली होती मटण पार्टी 

प्रिंस हा अत्यंत कुख्यात गुन्हेगार होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी उपचाराच्या बहाण्याने तो रुग्णालयात आला होता. तिथे त्याने तैनात असलेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्मी स्टाईलने मटण पार्टी दिली. पोलीस जेवण्यात मग्न असताना त्याने त्यांना एका खोलीत कोंडले आणि तिथून पळ काढला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २०१७ मध्ये त्याने हाजीपूर न्यायालयात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या देखील केली होती.

लूटमार टोळीचा मास्टरमाईंड 

प्रिंस हा बिहारमधील सर्वात मोठ्या टोळीचा म्होरक्या सुबोध सिंह याचा अत्यंत जवळचा आणि शार्प शूटर मानला जात होता. त्याच्यावर लूटमार, हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सुमारे ४० हून अधिक गुन्हे दाखल होते. या टोळीने देशभर धुमाकूळ घातला होता. 

प्रिंसच्या मृत्यूने गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या लपंडावाचा शेवट झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असून एफएसएल टीम तपास करत आहे. या कारवाईमुळे बिहारमधील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious criminal Prince, who fled after mutton party, killed in encounter.

Web Summary : Bihar's infamous criminal Prince, who escaped police custody after a mutton party, was killed in an encounter. Police seized weapons; FSL is investigating. He had 40+ cases against him.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार