खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 21:27 IST2020-06-08T21:23:00+5:302020-06-08T21:27:28+5:30
आरोपी मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सध्या आरोपी युवकावर कारवाई केली जात आहे.

खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल
नोएडा पोलिसांनी बदला घेण्यासाठी अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणात मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनीपश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सध्या आरोपी युवकावर कारवाई केली जात आहे.
३ मार्च रोजी एका मुलीने नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तिचा अश्लील व्हिडिओ फोटो सोशल मीडिया साइट्स फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि बर्याच पॉर्न साइट्सवर सतत अपलोड केला जात आहे आणि व्हायरल होतो आहेत अशी माहिती दिली होती. इतकेच नाही तर अनेक वेबसाइट्सवर पेटीएमच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ विकले जात आहेत, अशी माहिती तिने तक्रारीत दिली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नोएडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी पीडितेचा पहिला प्रियकर होता आणि ४ ते ५ वर्षांपासून या दोघांमध्ये संबंध होते. मात्र, ब्रेक अपनंतर बदला घेण्यासाठी या तरूणाने मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल साइटवर टाकला. सध्या आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या :
धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत
खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल
३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत
आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित
उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक
लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट
चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख