शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जात पडताळणीचे नाशिकचे उपसंचालक, विधी अधिकाऱ्यांसह लाच घेताना चारजण जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 3:54 PM

विशेष म्हणजे हे अधिकारी शिर्डीत एका ठराविक हॉटेलला वारंवार येत असत व तेथेच ते संबधितांना बोलावून कामाच्या बदल्यात लाच घेत असत आणखीही काही कागदपत्रे मिळाली

ठळक मुद्देअनेक प्रकार पुढे येण्याची शक्यता लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली़तक्रारदार लाच देत असतांनाच पोलीसांनी संबधितांना रंगेहात व पंचासमक्ष ताब्यात घेतल्याचे या विभागाकडुन सांगण्यात आले़

शिर्डी - एस़टी़ प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी करणाऱ्या नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक व विधी अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी शिर्डीत एका ठराविक हॉटेलला वारंवार येत असत व तेथेच ते संबधितांना बोलावून कामाच्या बदल्यात लाच घेत असत आणखीही काही कागदपत्रे मिळाली असून यातून अनेक प्रकार पुढे येण्याची शक्यता लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक (वर्ग १)रामचंद्र रतीलाल सोनकवडे, (वय-४०, रा. पकाल रोड, काटे गल्ली, द्वारका, नाशिक) व विधी अधिकारी शिवाप्रसाद मकूंदराव काकडे, (वय-४१, वसंत विहार, बडदेनगर, सिडको, नाशिक), विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन (वय-३३, खासगी चालक, वसंत विहार, बडदेनगर, सिडको, नाशिक), मच्छिंद्र मारूती गायकवाड, (वय-४८, लॅब बॉय, वर्ग-४, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, नगर -रा. शिवाजीनगर, नविन नागापूर, एमआयडीसी, अहमदनगर) अशी या आरोपींची नावे आहेत.धनकवडी, पुणे येथील एका व्यक्तीला एस़टी़ प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी सोनकवडे व काकडे या आरोपींनी काल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. आज रात्री एकच्या सुमारास शिर्डीतील हॉटेल साई आसरा येथील रूममध्ये दोन्ही आरोपींना भेटल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम हॉटेलबाहेर असलेल्या महाजन व गायकवाड यांच्याकडे देण्यास सांगितली. यानंतर तक्रारदार लाच देत असतानाच पोलीसांनी संबधितांना रंगेहाथ व पंचासमक्ष ताब्यात घेतल्याचे या विभागाकडुन सांगण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे नगरचे पोलीस उपाधिक्षक हरीष खेडकर व पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे यांनी सापळा रचुन आरोपींना पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस कर्मचारी तन्वीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, सतिष जोशी, चालक अशोक रक्ताटे, विजय गंगुल, खेमनर, रविंद्र निमसे आदींचा सहभाग होता़ अलीकडच्या काळातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे़. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकshirdiशिर्डी