शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

आमदार पत्नीच्या ‘त्या’ संदेशामुळे वाढले गूढ; पोलिसांकडून तपास सुरू, संदेशात ‘तिचा’ उल्लेख? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 7:54 AM

या संदेशात एका महिलेचा उल्लेख करत, काही बरे वाईट झाल्यास संबंधित महिलेला जबाबदार धरण्याबाबत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, नेहरू नगर पोलिसांनी याला दुजोरा दिला नसून, तपास सुरू असल्याचे सांगितले.

मुंबई :  कुर्ला येथील शिवसेनेचे आमदारमंगेश कुडाळकर यांची पत्नी रजनी यांनी आत्महत्येपूर्वी मुलाला पाठवलेल्या अखेरच्या संदेशामुळे याप्रकरणाचे गूढ आणखीन वाढले आहे. या संदेशात एका महिलेचा उल्लेख करत, काही बरे वाईट झाल्यास संबंधित महिलेला जबाबदार धरण्याबाबत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, नेहरू नगर पोलिसांनी याला दुजोरा दिला नसून, तपास सुरू असल्याचे सांगितले.मंगेश कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीसह आई वडिलांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले. या अपघातात कुडाळकर आणि त्यांची दोन मुले थोडक्यात बचावली. त्यानंतर, त्यांनी कुर्ला परिसरात  राहणाऱ्या रजनी यांच्याशी विवाह केला. रजनी यांना  पहिल्या पतीपासून दोन मुले होती. त्यांचीही जबाबदारी कुडाळकर यांनी स्वीकारली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रजनी यांचा मुलगा प्रज्वल याचा चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा हर्षल त्यांच्यासोबत राहण्यास होता. पहिल्या मुलाच्या निधनामुळे त्या तणावात होत्या. त्यातच रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलगा हर्षलच्या मोबाईलवर पाठवलेल्या अखेरच्या संदेशामुळे याप्रकरणाचे गूढ  वाढले आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा हर्षल थेट पोलीस ठाण्यात आला होता.

पोलिसांचा मात्र दुजोरा नाहीहर्षलला केलेल्या संदेशात एका महिलेचा उल्लेख करण्यात आला आहे. ही महिला त्यांच्या पहिल्या पतीच्या कुटुंबीयांपैकी एक असल्याचेही समजते. पोलीस रजनी यांचा मोबाईल ताब्यात घेत अधिक तपास करत आहेत. या संदेशाबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बाबल यांनी दुजोरा दिला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMLAआमदारMangesh Kudalkarमंगेश कुडाळकरPoliceपोलिस