Join us  

दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! पिवळ्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 1:14 PM

दीपिकाचा प्रेग्नंसी लूक पाहिलात का?

अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. २० मे ला मुंबईत झालेल्या मतदानाला दीपिका आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. तेव्हा दीपिकाचा पहिल्यांदाच बेबीबंप दिसला. मात्र तिच्या विचित्र चालण्यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. आता दीपिकाने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तिचा बेबीबंप स्पष्ट दिसत असून प्रेग्नंसी ग्लोही दिसत आहे. 

दीपिका पदुकोण सप्टेंबर महिन्यात पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती ५ महिन्यांची गरोदर आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका कोणाच्याच नजरेत आली नव्हती. तिचा प्रेग्नंसी लूक पाहण्यासाठी चाहते आतुर होते. काही दिवसांपूर्वीच ती रणवीर सिंहसोबत दिसली. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आता तिने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये ती तिचा स्वत:चा ब्रँड 82e चं प्रमोशन करत आहे. यात तिने हिरव्या रंगाचा वनपीस घातला आहे. तिचा बेबीबंप स्पष्ट दिसतोय. शिवाय तिचा प्रेग्नंसी ग्लो लक्ष वेधून घेत आहे. 

दीपिकाच्या व्हिडिओवर अभिनेत्री बिपाशा बासूने कमेंट करत लिहिले, 'अशीच आनंदी राहा. काळजी घे'. दीपिकाचा प्रेग्नंसी लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

दीपिका आगामी 'सिंघम अगेन','कल्की' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. प्रेग्नंट असताना तिने 'सिंघम' चं शूट केलं. याचा फोटो रोहित शेट्टीने शेअर केला होता. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडप्रेग्नंसीसोशल मीडिया