Join us  

पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:47 PM

गोविंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना भेटून त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर केलाय. (govinda, amit shah, narendra modi)

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. भाजपा, कॉंग्रेस आणि इतर सर्व प्रादेशिक पक्ष निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसत आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची सुद्धा चर्चा आहे. कंगना रणौत यावेळी हिमाचलमधील मंडी भागातून निवडणुकीसाठी उभी आहे. याशिवाय शेखर सुमन, रवी किशन आणि इतरही अनेक सेलिब्रिटी निवडणुकांसाठी उभे आहेत. अशातच अभिनेता गोविंदाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोविंदाने त्याचा आनंद व्यक्त केलाय. 

पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाचा आनंद गगनात मावेनासा

अभिनेता गोविंदाने काहीच दिवसांपुर्वी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय गोविंदाने मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. फोटोत पाहू शकता की गोविंदा मोदी - शाहांना हस्तांदोलन करुन त्यांना सदिच्छा देत आहे. हे फोटो शेअर करुन गोविंदा लिहितो, "मुंबईमधील एका कँपेनच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यांना भेटणं ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट आहे."

 

 अमित शाहांबद्दल काय म्हणाला गोविंदा?

पुढे गोविंदाने अमित शाह यांच्यासोबतचा एअरपोर्टवरचा फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करुन गोविंदा लिहितो, "देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. वैयक्तिक जीवनात मी त्यांचा खूप आदर करतो." अशाप्रकारे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून गोविंदाने त्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केलाय. दरम्यान शिवसेनेच्या प्रचारासाठी गोविंदा विविध सभांंमध्ये उपस्थित राहताना दिसला.

टॅग्स :गोविंदानरेंद्र मोदीअमित शाह